स्वागत २०१८ ! विशेष सुरक्षा कवचात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

रत्या वर्षाला गुडबाय करत जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पवई, चांदिवली, साकीनाका भागात सुद्धा तरुणाईने आतीषबाजी करत नव्या वर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या स्वागतासाठी येथील हिरानंदानी, लेक होम कॉम्प्लेक्सना आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले होते. कायदा सूव्यवस्था आणि गर्दीचा फायदा घेवून देश विघातक कारवाई करणारे गट सक्रीय होऊ नयेत म्हणून मुंबई पोलिसांसह, क्यूआरटी आणि बॉम्ब शोधक पथकासह पवईला जोडून असणाऱ्या एनएसजी कमांडोंची विशेष टिम सुद्धा यावेळी सुरक्षेवर नजर ठेवून होती.

हिरानंदानीत रोषणाई

नववर्षाच्या स्वागताला मुंबईकरांचे मुख्य आकर्षण असणाऱ्या पवईमधील हिरानंदानी कॉम्प्लेक्सला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात सर्व वयोगटातील मुंबईकरांनी संध्याकाळी ८ नंतर येथे हजेरी लावून सेल्फी आणि फोटो घेण्याचा आनंद घेतला. चांदिवलीतील लेक होम कॉम्प्लेक्सने सुद्धा याच पावलावर पाऊल टाकत संपूर्ण परिसराला रोषणाई केली होती.

विशेष सुरक्षा

पवईमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी होणाऱ्या गर्दीला पाहता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पवई पोलिसांसह, राखीव दलाला तैनात करण्यात आले होते. पवई तलाव, आयआयटी आणि हिरानंदानी या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार असल्याने या ठिकाणी जास्त फौजफाटा तैनात करण्यात आला होता. देशविघातक कारवाईची शक्यता पाहता विशेष सुरक्षा म्हणून बॉम्ब शोधक पथक आणि अशा प्रकरच्या घटनांशी लढण्यासाठी बनवण्यात आलेली क़्युआरटी ही विशेष टिम सुद्धा परिसरात गस्त घालून गर्दींच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवून होती.

सोसायटीत स्वागताचे आयोजन

हॉटेल्स आणि पबमध्ये नववर्षाच्या पार्ट्या साजऱ्या करायच्या प्रथेला यावर्षी बगल देत पवई, चांदिवलीमधील अनेक सोसायट्यांनी रहिवाशांसाठी आपल्याच सोसायटीत पार्ट्यांचे आयोजन केले होते. चांदिवलीतील नहार कॉम्प्लेक्स यात अग्रेसर होता. येथील बऱ्याच सोसायट्यांनी ही संकल्पना राबवली होती.

दुकानांवर कारवाई

कमला मिलमधील पबला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १४ लोकांना प्राण गमवावे लागल्यानंतर पालिकेने मुबईभर धडक कारवाई करत ३०० पेक्षा जास्त हॉटेल्स पब्सवर कारवाई केली होती. याचाच भाग म्हणून पालिका एस विभागाने पवईतील अग्नीसुरक्षा आणि परवानग्याना धाब्यावर बसवत राजरोसपणे सुरु असणाऱ्या हॉटेल्स, पब्स, इटेरीज यांच्यावर कारवाई करत नववर्षाच्या सुरवातीला निष्काळजीपणामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची विशेष काळजी घेतली होती.

[fblikeurl=”www.facebook.com/avartanpowai.info” style=”standard” showfaces=”false” width=”600″ verb=”like” font=”arial”]

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!