हिरानंदानीत बेकायदा खाद्यविक्री दुकानांवर पालिकेची कारवाई

bmc actionपाहारगृहातील सिलेंडर स्फोटाने आठ जणांचा बळी घेतल्यानंतर, जाग आलेल्या पालिकेने गेले तीन दिवस मुंबईतील विविध हॉटेल्स आणि खाद्यविक्री केंद्रांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. याचाच एक भाग म्हणून, पालिका एस विभागाने मंगळवारी पवईतील हिरानंदानी भागात दुकानांच्या बाहेर बेकायदेशीररित्या चाललेल्या खाद्यविक्री दुकानांवर कारवाई केली. कारवाईची खबर लागताच अनेक बेकायदेशीररित्या चालणाऱ्या खाद्यपदार्थ विक्री दुकानदारांनी दिवसभर आपली दुकाने बंदच ठेवणे पसंद केले होते.

मुंबईतील हजारो उपाहारगृहांमध्ये अनधिकृत बांधकाम व विनापरवाना खाद्यपदार्थ शिजवण्याचे काम रस्त्यांवर बेधडक चालू असते. त्या ठिकाणी काम करणारे कामगार आणि खाद्यपदार्थ खाण्यासाठी येणारे मुंबईकर, अशा सगळ्यांच्या जीवाशी खेळत यांचे मालक माया जमा करण्यात व्यस्त असतात. याकडे पालिका मात्र सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याने, कुर्ला येथील सिटी किनारा उपाहारगृहामध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन ८ जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर मात्र महानगरपालिकेला खडबडून जाग आली असून, उपहारगृहांची तपासणी केली असता अनेक ठिकाणी अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत, अनेक फास्ट फूड, चहाची दुकाने, वडापाव सेंटर हे बेकायदेशीरपणे नियम धाब्यावर बसवत नियमबाह्य पद्धतीने चालत असल्याने पालिकेने आता त्यांच्यावर कारवाईची बडगा उगारलेला आहे.

खाद्यपदार्थाचे दुकान किंवा उपाहारगृह सुरू करण्यापूर्वी महानगरपालिकेकडून विविध प्रमाणपत्रांसह ना-हरकत प्रमाणपत्रांची गरज असते. ज्यात अग्निसुरक्षा, बांधकाम विभाग यांच्या परवानगीपासून आरोग्य विभागाच्या प्रमाणपत्रांपर्यंत विविध १४ परवानग्या आवश्यक असतात. अनेक खाद्यपदार्थ विक्रेते व उपहारगृहे हे परवानग्या न घेता, नियम धाब्यावर बसवत व्यवसाय करत असतात आणि त्याच्याच परिणाम स्वरूप अचानक एखादा अपघात घडतो आणि निष्कारण गरीब कामगार किंवा ग्राहकांना आपले जीव गमवावे लागतात.

पवईमधील हिरानंदानी सारख्या बड्या वस्तीतही अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवत खाद्यविक्री दुकाने, चहाचे ठेले, वडापाव सेंटर चालवली जात आहेत. मंगळवारी पवई विभागात कारवाईसाठी आलेल्या एस विभागाने न-जुमानता अशा बेकायदेशीर आणि नियमबाह्य खाद्यविक्री केंद्रांवर कारवाई केली. या पैकी काही दुकानांना यापूर्वीही पालिकेने नोटीस बजावून बेकायदा बांधकाम आणि खाद्यविक्री केंद्रे बंद करण्याची सूचना केली होती; परंतु त्यानंतरही चालू ठेवलेल्या दुकानांवर पालिकेने धडक कारवाई केल्याने पालिका आमच्यावर कधीच कारवाई करू शकत नाही अशी खोटी आशा बाळगणाऱ्या या खाद्यविक्री दुकान मालकांना हा चांगलाच दणका होता.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!