एक पाऊल माणुसकीच्या दिशेने; मुंबई कॉंग्रेस आयोजित रक्तदान शिबिरात १९७ जणांनी केले रक्तदान

मुंबई कॉंग्रेस विक्रोळी विभागातर्फे २० मे रोजी पवई इंग्लिश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोव्हीड – १९ संक्रमणांच्या वाढत्या संख्येविरूद्ध लढा देण्यासाठी मदत करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्यकारी अध्यक्ष चरणसिंह सप्रा, मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जेनेट ताई डिसूझा, माजी मंत्री नसीम खान, उत्तर पूर्व मुंबई कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबराम रॉय मणी, कमलप्रीत कौर आणि इतर कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पवई परिसरातील तरुणांसह पवई पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी यांनी रक्तदान करत माणुसकीच्या भावना जपण्याचे काम केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच नेब्युलायझर्स इलेक्ट्रिकल वाफारा मशीन देवून सामाजिक कार्यात सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यावेळी बोलताना म्हणाले की, “महामारीच्या काळात रक्ताचा जाणवणारा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान मोहिमे’च्या अंतर्गत मुंबई कॉंग्रेसतर्फे विविध भागात अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पवईमध्ये सुद्धा रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात होत आहे. मला अभिमान आहे की या साथीच्या काळात रक्तदात्यांनी मानवतेसाठी मदत करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे.”

“आपण कोविड -१९ सारख्या साथीच्या आजाराशी लढा देत आहोत. याचा प्रसार कमी करण्यासाठी आणि बाधितांचे प्राण वाचवण्यासाठी लसी इतकेच रक्ताचे महत्व आहे. संकटांच्या या काळात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि जाणवणारा तुटवडा कमी करण्यासाठी आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.” असे याबाबत बोलताना मुंबई कॉंग्रेस, ईशान्य मुंबई अध्यक्ष रॉय मणि म्हणाले.

यावेळी सर्व रक्तदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानताना प्रदीप वर्मा (ब्लॉक अध्यक्ष प्रभाग १२२) म्हणाले, “पवईसह आसपासच्या भागातून लोकांनी या मोहिमेत रक्तदान केले आहे. संकटाच्या या काळात साथीच्या रोगादरम्यान लोकांना मदत करण्यासाठी आणि जीवन वाचविण्याकरिता ज्यांनी रक्तदान केले आणि आपली जबाबदारी पार पाडली त्या सर्व रक्तदात्यांचे मी आभार मानतो.”

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!