पार्कसाईटमध्ये घरात सिलेंडर स्फोट, ८ जण जखमी

blast parksiteपार्कसाईट विक्रोळी येथील आंबेडकरनगर सोसायटीत शनिवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी स्फोट झालेल्या घरातील दोघे गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घर रस्त्याला लागून असल्याने घरातील काही लोक आणि पादचारीही यांचा जखमींमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत घरात अडकलेल्यांना बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमींना उपचारासाठी राजावाडी व सायन रुग्णालयात दाखल केले आहे.

चाळीतील घरामध्ये सिलेंडर लीक झाल्यामुळे हा स्फोट झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की त्यामुळे घरालाही आग लागली आणि घराचा बराच भाग जळून खाक झाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रणही मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या घरातील सिलेंडरही बाहेर काढण्यात आले होते. अग्निशमन दलाकडून या स्फोटाचं नेमकं कारण शोधण्याचे काम सुरु आहे.

या स्फोटात ८ – १० जण जखमी झाले असून, ज्यात एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. स्फोटात गंभीररित्या जखमी झालेले हे त्या घरातीलच आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती यावेळी बोलताना पार्कसाईट पोलिसांनी दिली.

कुर्ल्यातील सिटीकिनारा रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन ८ जण ठार झाल्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस ही पूर्ण झाला नसेल कि या स्फोटामुळे लोकांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जखमींमध्ये संतोष शिंदे (३१), विमल चौहान (५०), सपना चौहान (२०), अनिकेत चौहान (१७), सुमन दानवाले (४५), सौरभ चौहान (१७), देवगन सिंह (४०), राहुल दानवाले (२२) यांचा समावेश आहे.

 

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!