पवईत २०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

@रविराज शिंदे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मुंबईसह महाराष्ट्रात रक्ताचा तुडवडा भासत असल्याने प्रशासनाची होणारी दमछाक याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने रक्तदानासाठी आव्हान केले होते. या आव्हानाला साद देत पवईकर रक्तदानासाठी पुढे सरसावले असून, रविवारी २०५ पवईकर रक्तदात्यांनी रक्तदान केले.

पवई प्रभाग क्रमांक १२२मधील युवासेना तर्फे पवई इग्लिंश हायस्कूल पटांगणात हे रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी लॉकडाऊनचे नियम आणि सोशल डिस्टंसिंग पाळत पवईकरांनी या रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. या रक्तदान शिबीरात नवतरूणांचा प्रामुख्याने सहभाग पहायला मिळाला.

मुंबई युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पवईतील युवासेना कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली हे रक्तदान शिबीर पार पडले. पल्लवी ब्लड बँकच्या माध्यमातून राबवलेल्या रक्तदान शिबीरात दिवसभरात २०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मानपत्र तसेच वाफारा घेण्याचे इलेक्ट्रिक मशीन देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

“कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि कोरोना बाधित रुग्णांना लागणाऱ्या प्लाज्माची आवश्यकता बघता येणाऱ्या काळात प्लाझ्मा डोनेशन शिबीर घेण्याचा आमचा विचार आहे,” असे याबाबत बोलताना युवासेना सोशल मिडिया समन्वयक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी विभाग अधिकारी विजय कुरकुटे, शाखाप्रमुख सचिन मदने, उपविभाग संघटिका स्नेहल मांडे, महिला शाखा संघटीका सुषमा आंब्रे, युवासेना सोशल मिडिया समन्वयक अमोल चव्हाण, प्रसाद चव्हाण, पंकज गडदे, आजिंक्य सांगळे, करण परब, अजय बडिगर, सुमित साळुंखे, श्वेता वायकर, श्रेया मोरे उपस्थित होते.

, , , , , ,

One Response to पवईत २०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

  1. Rahul Jamdhade May 18, 2021 at 8:24 am #

    They have not take any Covid19 negative certificate then whether this blood will usefull.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: