मुंबई आयआयटीतील विद्यार्थीनीना विषबाधा

मुंबई आयआयटीमधील मुलींच्या हॉस्टेल क्रमांक १० मधील विद्यार्थीनीना गोड खाण्यातून विषबाधा झाल्याचे सोमवारी समोर आले आहे. ही विषबाधा शनिवारी झाल्याचे समोर येत असून, सुरुवातीला नाकारणाऱ्या आयआयटी प्रशासनाने सोमवारी सायंकाळी उशिरा मान्य केले.

विषबाधेमुळे २५ विद्यार्थीनीना आयआयटीच्या अंतर्गत रुग्णालयात दाखल करून, उपचारानंतर सर्वांना सोडून देण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र शेवटची बातमी हाती आली तोपर्यंत काही मुली आयआयटीच्या अंतर्गत उपचार घेत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

आयआयटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पसमध्येच हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय आहे. हॉस्टेल क्रमांक १० हे मुलींचे वसतीगृह आहे. शनिवारी येथील विद्यार्थीनीना दिलेल्या जेवणात असणाऱ्या गोड पदार्थांतून विषबाधा झाल्याचे सांगितले जात आहे. मुलींनी जेवणानंतर पोटदुखी आणि उलट्याची तक्रार केल्यानंतर त्यांना त्वरित आयआयटी अंतर्गत असणाऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘जेवणात बनवलेला गोड पदार्थ खाल्याने मुलींना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विद्यार्थिनीच्या वसतीगृह असणारी मेस स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात आली असून, पालिकेकडूनही मेसची तपासणी करण्यात आली. अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. विषबाधेचे कारण अहवालानंतर कळेल,’ असे आयआयटी प्रशासनाने याबाबत बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!