गणेश विसर्जन घाटाजवळ होमगार्ड अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

पवई येथे शनिवारी रात्री घडलेल्या हिट अँड रन अपघातात एका २५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण हा होमगार्ड अधिकारी होता. शनिवारी रात्री कर्तव्यावरुन परतत असताना हा अपघात घडला. पवई पोलिसांनी याबाबत अज्ञात वाहनचालकाविरुध्द निष्काळजीपणे आणि हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सचिन काशिनाथ धुमक यांना शनिवारी मरोळ येथे ड्युटी देण्यात आली होती. दुसरी शिफ्ट संपल्यानंतर रात्री अकरा वाजता ते जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) मार्गे दुचाकीवरुन आपल्या घरी (मुलूंड) जात होते.

माझ्या मुलाचा जेव्हीएलआरवरील गणेश घाटाजवळ अपघात झाला असून, त्याला हिरानंदानी रुग्णालयात घेवून जात असल्याचे एका व्यक्तीने फोन करून सांगितले. तासाभरानंतर आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे आम्हाला सांगण्यात आले, असे मृताचे वडील काशिनाथ धुमक यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

“आम्ही त्याला रुग्णालयात घेवून जाणाऱ्या इसमांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, ते जवळच असलेल्या एका बस स्टॉपवर उभे होते. त्यांना नक्की काय घडले हे माहित नाही. एक जोरदार आवाज ऐकू आल्याने ते तिकडे गेले असता एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना आढळून आला. त्याला ते रुग्णालयात घेवून गेले,” असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

पवई पोलिस याबाबत अज्ञात वाहनचालकावर भारतीय दंड संहितेचे कलम २७९ (बेदरकारपणे, निष्काळजीपणाने वाहन चालविणे), ३०४-ए (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करून अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!