हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटीच्या निःस्वार्थ सेवेची २५ वर्षे

@अनामिका शर्मा

अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटी आणि रामबाग पवई वेल्फेअर सोसायटी आयोजित “पवई झील का राजा” गणेशोत्सवानिमित्त एक भव्य भंडारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रिय बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासोबतच हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदाचा भंडारा अधिक खास होता कारण या नि:स्वार्थ सेवेने आणि भक्तीने ह्यावर्षी २५ वर्षे पूर्ण केली आहेत.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्वयंसेवक निःस्वार्थपणे काम करीत असल्याचे पहायला मिळत होते. त्यांच्या चैतन्य, उर्जा आणि भक्तीमुळे उत्सवाच्या उत्साहात भर पडली होती. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचविणार्‍या हानिकारक पद्धतींची लोकांना जाणीव करून देण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग केला गेला.

हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटी आणि रामबाग पवई वेलफेयर सोसायटी आयोजित “पवई झील का राजा” गणेशोत्सवानिमित्त पाठीमागील ४ वर्षापासून पर्यावरण पूरक इकोफ्रेंडली गणपतीची स्थापना केली जाते. १० दिवस बाप्पाच्या मनोभावे सेवेनंतर परिसरात कुंडीत त्याचे विसर्जन करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जात आहे.

१० दिवसात मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तलावाच्या पाण्यात विसर्जित केल्या जातात, ज्यामुळे तो दूषित होतो. दुसर्‍या दिवशी विसर्जनानंतर तलावाच्या सभोवती बरीच विखुरलेल्या, तुटलेल्या मूर्ती आणि कचरा दिसतो. बाप्पाच्या उत्सवावेळी निसर्गाचे आणि वातावरणाचे कोणतेही नुकसान आणि नाश टाळण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. बाप्पाला देखील नक्कीच असा नाश करणारा उत्सव त्याच्या भक्तांनी साजरा करावा असे वाटत नसणार.

सण, उत्सव म्हणजे एकत्र आणणे, ऐक्य वाढवणे आणि आनंद पसरवणे. या उत्सवाने प्रत्येकाला धर्म, जाती किंवा सामाजिक आणि आर्थिक स्थिती विचारात न घेता एकत्र आणले. एकत्रितपणे आपले पर्यावरण वाचवण्यासाठी, आपल्या पिढ्यांसाठी सुरक्षित असलेल्या आनंद आणि प्रथा पसरवण्यासाठी काम केले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!