पवई पोलिसांच्या गाडीवर दगडफेक; ३ आरोपींना अटक

प्रमोद चव्हाण

पवई परिसरात गस्त घालत असताना पोलीस गाडीवर हल्ला करणाऱया ३ तरुणांच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राहुल सिंग, इस्माईल शेख, शिवकुमार उर्फ भैय्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपी हे नशेखोर असून, पोलिसांना घाबरवण्यासाठी त्यांनी हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे.

पोलीस शिपाई अजय बांदकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदकर हे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत पवई पोलिसांच्या हद्दीतील मोरारजीनगर येथे गस्त घालत असताना काही जण रस्त्याच्या कडेला बसून नशा करत असल्याचे दिसले. पोलीस वाहन जवळ येताना बघताच त्यांनी तेथून पळ काढला. सर्वजन गल्लीबोळात अंधारात पळून गेल्याने पोलीस पुढे निघून गेले.

“आमची गाडी त्याच मार्गाने परत येत असताना तरुणांनी अचानक आमच्या गाडीवर दगडफेक केली. ज्यात आम्ही थोडक्यात बचावलो, असे बांदकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी त्वरित अतिरिक्त फौजफाट मागवत आरोपींचा शोध सुरू केला. “मिळालेल्या वर्णनावरून २४ तासाच्या आत आम्ही ३ आरोपींना अटक केली आहे, असे याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुनसे यांनी सांगितले.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!