संघर्षनगर परिसरातून ३४५ किलो गांजा जप्त; एकाला अटक

साकीनाका पोलीस ठाणे हद्दीमधील संघर्षनगर, चांदिवली येथे छापा टाकत साकीनाका पोलिसांनी ५१ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा ३४५ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात साकीनाका पोलिसांनी नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा नोंद करत, एकाला अटक केली आहे.

सध्या राज्यात ड्रग प्रकरण गाजत असून, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणांचा शोध अधिक वेगाने होऊ लागला आहे. अनेकांची एनसीबीकडून चौकशी सुरु असून, ठिकठिकाणी धाडसत्र सुरुच आहेत. चौकशी दरम्यान या प्रकरणाचे जाळे खूप विस्तारले असल्याचे लक्षात येते.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाचा साठा चांदिवली संघर्षनगर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुधन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाडवी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी उपयुक्त माहितीच्या आधारे संघर्षनगर, चांदिवली येथे छापा टाकून ३४५ किलो (किंमत रुपये ५१ लाख ८२ हजार ४७५) गांजा हस्तगत केला.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे माध्यमातून व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी नामे अशोक माणिक मैत्री (३९) वर्षे यास या गुन्ह्यात अटक केली आहे. “सदर प्रकरणी कलम ८ (क) २०(ब) ii (क) अंमली पदार्थ विरोधी कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या इतर आरोपी साखळीचा आम्ही शोध घेत आहोत” असे याबाबत बोलताना साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी सांगितले.

पोलीस उपआयुक्त, परी १० डॉ. श्री महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग नागरे, वपोनि साकीनाका पोलीस ठाणे बळवंत देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!