पवईत आज ६ कोरोना बाधितांची नोंद

पवईतील कोरोना बाधितांच्या संख्येने २०० बाधितांचा टप्पा पार केला आहे. सोमवार, २५ मे रोजी यात ६ बाधितांची वाढ झाली आहे. सोमवारी मिळालेल्या बाधितांमध्ये एकाच कुटुंबातील दोघे तर अगोदर मिळून आलेल्या बाधिताच्या परिवारातील व्यक्तीचा समावेश आहे. पालिकेतर्फे हे संपूर्ण परिवार सिल करण्यात आले असून, नागरिकांना सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई भोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. मुंबईतील कुठलाच परिसर यातून सुटला नसून, पालिका एस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई परिसरात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी या आकड्याने २०० बाधितांचा आकडा पार केला आहे. सोमवारी या आकड्यात अजून ६ बाधितांची भर पडली आहे.

सोमवारी मिळालेल्या बाधितांमध्ये आयआयटी मार्केट परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्या पाठोपाठ चैतन्यनगर येथील एका शाळेजवळील चाळीत राहणाऱ्या ४९ वर्षीय महिलेचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सोबतच स्वामीनारायण नगर येथील ५० वर्षीय पुरुष सुद्धा कोरोना बाधित असल्याचे समोर येत आहे.  २३ मे रोजी कोरोना बाधित सापडलेल्या ५६ वर्षीय पुरुषाच्या परिवारातील १८ वर्षीय तरुणाचा अहवाल सुद्धा सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. यापाठोपाठ सन श्रुष्टी इमारत साकीविहार रोड येथे राहणाऱ्या आणि २१ मे रोजी कोरोना बाधित म्हणून मिळून आलेल्या ५१ वर्षीय पुरुषाच्या कुटुंबातील ४५ वर्षीय महिला आणि १८ वर्षीय तरुणीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेतर्फे हे सर्व परिसर सिल करण्यात आले असून, स्थानिक रहिवाशांना आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!