सात फुट लांब मगरीला पॉज मुंबईचे जीवनदान

सात फुट लांब मगरीला पॉज मुंबईचे जीवनदान

संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असून, आवश्यकता नसताना कोणालाही घरातून बाहेर निघण्याची अनुमती नसताना शिकारीच्या शोधात बाहेर पडलेल्या ७ फुट लांब ७२ किलो वजनाच्या मगरीला पॉज मुंबई च्या प्राणीमित्रांनी तिला पकडून जीवनदान दिले आहे. नंतर तिला नैसर्गिक वास्तव्यात सोडून देण्यात आले आहे. भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलवाहिनीखाली ही मगर आढळून आली होती.

पूर्ण मुंबई शहर लॉकडाऊनमध्ये असताना प्राणीमित्र संघटना प्लॅंट अन्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी – मुंबई (पॉज-मुंबई) आणि अम्मा केअर फाऊंडेशनच्या (एसीएफ) हेल्पलाइन नंबरवर सकाळी ९ : २५ वाजता एक फोन आला. यावेळी मुंबई महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्याजवळ जलवाहिनी खाली सहा फुटी खड्ड्यामध्ये एक मगर अडकली असल्याची माहिती त्यांना दिली.

मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांच्या नेतृत्वाखाली पॉज-मुंबई आणि एसीएफचे स्वयंसेवक हसमुख वळंजू, तन्मय कोलते आणि चंद्रमणी यादव हे घटनास्थळी पोहचले. परिस्थितीची पाहणी करून पूर्ण काळजी घेत खड्डयात अडकून पडलेल्या ७ फुटी मगरीची सुटका करून, ही माहिती डॉ जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) ठाणे व संतोष कंक, वनक्षेत्रपाल (प्रादेशिक) मुंबई यांना देण्यात आली.

“वन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आम्ही मगरीला वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे वनविभाग कार्यालयात घेवून जावून पॉज-मुंबई, एसीएफचे वन्यजीव पशुवैद्यक डॉ. मनीष पिंगळे यांच्याकडून मगरीची तपासणी करण्यात आली” असे याबाबत बोलताना एसिएफच्या निशा कुंजू यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.

“तपासणी करून डॉ. पिंगळे यांनी मगर तंदुरुस्त आणि निरोगी असून, ७५ किलो वजनाची मादी असल्याचे सांगितले” असे याबाबत बोलताना सुनिष कुंजू यांनी सांगितले.

कुंजु पुढे म्हणाले, “त्यानंतर वनक्षेत्रपाल (प्रादेशिक) मुंबई शिघ्र बचाव दल कर्मचारी संतोष भागणे यांच्या उपस्थितीत मगरीला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडण्यात आले आहे.” ही मगर शिकारीच्या शोधात किंवा ऊन खाण्यासाठी किनाऱ्यावर आली असावी आणि त्या खड्डयात पडली असावी अशी शंका सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!