पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने पळवले; हिरानंदानीतील घटना

आपले काम संपवून घरी परतत असणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने भामट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी पवईतील हिरानंदानी भागात घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सिसिटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील विजयविहार इमारतीत राहणारे विलास बांदेकर (७६) मंगळवारी सकाळी हिरानंदानी येथील आपल्या बँकेच्या शाखेत व्यवहारासाठी गेले होते. आपले काम संपवून ११ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतत असताना एसएमशेट्टी शाळेजवळ एका व्यक्तीने त्यांना अडवत आपण पोलीस अधिकारी असल्याचे बोलत ‘तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे’ म्हणून सांगितले.

ते दोन लोक होते. मोटारसायकलवरून आले होते. मी जवळ जाताच त्या व्यक्तीने तुम्हाला माहिती आहे ना बाहेर काय स्थिती आहे. दागिने घालून का फिरताय असे म्हणत माझ्याजवळील सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले, असे पोलीस जवाबात बांदेकर यांनी म्हटले आहे.

‘बांदेकर यांना बोलण्यात गुंतवून ठेवून इसमांनी मोठ्या हातचलाखीने दागिने लांबवत ते पिशवीत ठेवले असल्याचे भासवले. थोडे पुढे निघून गेल्यावर बांदेकर यांनी आपले दागिने तपासून पाहिले असता ते गायब होते’ असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.

‘भादवि कलम ४२०, १७०, ३४ अनुसार गुन्हा नोंद करून, तक्रारदार यांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे आम्ही सिसिटीव्हीच्या आधारे घटनेपूर्वीचे आणि घटनेनंतरचे हिरानंदानी भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत,’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!