१३ डिसेंबरला पवईत सायक्लोथॉनचे आयोजन

मुलांना शाळेत, महाविद्यालयात जाताना सायकलचा वापर करण्यासाठी यंग इन्वायरमेंटलिस्टचे आवाहन

cyclवाहनाच्या बाहेर पडणाऱ्या धुरातून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन पसरल्याने वायूप्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याबरोबरच एक उत्तम आरोग्य मिळावे म्हणून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रुस्टच्या वतीने लोकांनी सायकल संस्कृती जपावी म्हणून सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.

१३ डिसेंबरला हिरानंदानीमधील हेरीटेज गार्डन येथून सकाळी ६.३० वाजता या सायक्लोथॉनला सुरुवात होणार असून ७ कि.मी आणि १५ कि.मी. अशा दोन टप्प्यात सायक्लोथॉन होणार आहे. १० वर्षापेक्षा मोठी मुले, मुली, पुरुष, स्त्रिया असे सर्व या सायक्लोथॉनमध्ये सहभाग नोंदवू शकणार आहेत.

सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच, खेळाडू सायकलिस्ट, विविध सायकल संघ सुद्धा या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

या संदर्भात आवर्तन पवईशी बोलताना इन्वायरमेंटलिस्ट ट्रुस्टच्या निर्मात्या आणि क्लायमेट रिआलीटी प्रोजेक्टच्या मार्गदर्शिका एल्सी गेब्रील म्हणाल्या, “पर्यावरण प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या कार्बनला रोखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. जर छोट्या छोट्या अंतरावरील कामासाठी मोठ्या प्रमाणात होणारा गाड्यांचा वापर टाळून पायी किंवा सायकलवरून प्रवास केला तर हे खूप मोठे योगदान होऊ शकते. यासाठी सर्वांनी पुढे येऊन सहभाग नोंदवणे महत्वाचे आहे.”

त्या पुढे म्हणतात, “यासाठी तरुणाई एक चांगले आदर्श निर्माण करू शकते, शाळेत किंवा महाविद्यालयात जाताना अगर पालकांच्या गाड्या घेऊन जाण्याऐवजी सायकलने प्रवास केला तर ते आरोग्यास लाभदायक ठरणार आहे व पर्यावरण रक्षणही होणार आहे. यासाठी प्रत्येक शाळांमधून आम्ही “सायकल टू स्कूल”चा उपक्रम राबवत आहोत. बऱ्याच मुला मुलींच्यात यामुळे प्रबोधन होऊन ते आता सायकलनेच शाळेत येत जात आहेत.”

काही शालेय मुलांनी याबाबत प्रतिक्रिया नोंदवताना सांगितले, ‘आम्हाला शाळेत सायकलने प्रवास करताना खूप गंमत येते, परंतु सकाळी आणि संध्याकाळी शाळेत येता-जाताना रस्त्यांवर वाहनांची तुफान गर्दी असते, त्यातून रस्ता काढणे मुश्कील होऊन जाते. काही वाहनचालक सायकलकडे दुर्लक्ष करत सुसाट वाहन घेऊन जातात, त्यामुळे भीती वाटते. सायकलिस्टसाठी जर एक वेगळा मार्ग दिला गेला तर हे प्रश्न उद्भवणारच नाहीत.

‘डोनेट युवर सायकल’ या उपक्रमातून संस्थेने लोकांना गरीब गरजू विद्यार्थ्यांना आपली जुनी किंवा वापरात नसलेली सायकल भेट देण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे ही मुले इच्छा असूनही केवळ दूरपर्यंत चालत जाण्याने वेळेवर शाळा, शिकवणीच्या ठिकाणी पोहचू शकत नाहीत त्यांना मदत होईल आणि तेही समाजात एक चांगले मानाचे स्थान मिळवू शकतील.

सायक्लोथॉनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि सहभाग नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!