‘बेस्ट’च्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात

गुरुवारी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास गोरेगांव आगाराची बेस्ट बसगाडी (क्रमांक एम एच ०१ एपी ००८९) बस मार्ग क्रमांक ४२५वर पवई येथून गांधीनगरच्या दिशेने निघाली होती. सदर बसगाडी गांधीनगर जक्शन (JVLR) येथील उड्डाणपूलाजवळ आली असता बसगाडीचे ब्रेक अचानक निकामी झाले. यावेळी बसवर कर्तव्यावर हजर असलेले बेस्ट बस चालक राजू जगन पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्यालगत डाव्या बाजूला असलेल्या मेट्रोच्या ब्रॅकेटवर आदळवून थांबवली. सुदैवाने या संपूर्ण घटनाक्रमात कोणत्याही प्रवाशास हानी पोहोचलेली नसून, कोणीही जखमी झालेले नाही. बेस्ट बस चालकाच्या समयसूचकतेमुळे गंभीर स्वरूपाचा अपघात मात्र निश्चित टाळला गेला.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार अपराज व वॉर्डन भरत कोंडुभैरी हे सदर ठिकाणी तात्काळ हजर झाले त्यांनी मेट्रोच्या हायड्रोक्रेनद्वारे अपघातग्रस्त बसगाडी बाजूला घेऊन वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यास हातभार लावला.

बेस्ट बस चालक राजू पवार, गोरेगांव आगार यांनी बसगाडीचा ब्रेक फेल झालेला असतानाही प्रसंगाधावन राखत बसगाडीवर नियंत्रण मिळवले आणि होणारा गंभीर स्वरूपाचा अपघात टाळला. त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीची दखल घेत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील बोंडे, वाहतूक विभाग जेव्हीएलआर यांनी तातडीने भेट  घेऊन, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

पवार यांनी जानेवारी २०१० साली बेस्ट उपक्रमात बस चालक म्हणून पदभार स्वीकारला. गेल्या १२ वर्षांपासून मुंबईकर प्रवाशांना ते आपली सर्वोत्तम अशी अविरत सेवा निःस्वार्थीपणे देत आहेत. बेस्ट उपक्रमात त्यांच्यासारखे कित्येक कुशल आणि अनुभवी बसचालक आहेत जे रोज लाखो मुंबईकर प्रवाशांची सुखरूप ने-आण करतात. बऱ्याचदा प्रवास करताना आपण घाईगडबडीत त्यांना साधं धन्यवाद म्हणायचं सुद्धा विसरून जातो.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!