पवई तलाव डॅमवर भिजायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

पवई तलाव डॅम भागात शुक्रवारी एक १३ वर्षीय मुलाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. २ दिवसांपासून बेपत्ता असणारा हा मुलगा आपल्या काही मित्रांसोबत येथे फिरण्यासाठी आला होता.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीमरी येथे राहणारा वैष रईस खान हा आपल्या काही मित्रांसोबत पवई तलाव भागात फिरण्यासाठी आला होता. डॅमवर आल्यावर त्यांना भिजण्याचा मोह आवरला नाही आणि मित्रांसोबत तो धबधब्याखाली भिजण्यासाठी पाण्यात उतरला.

“अचानक आपल्या मित्रांना मी आलोच म्हणून सांगून तो तिथून निघून गेला तो परतलाच नाही. याची माहिती त्याच्या मित्रांनी त्याच्या आई-वडिलांना दिल्यावर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पवई पोलिसांचे पथक दोन दिवसापासून पवई तलाव आणि आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेत होते. शुक्रवारी शोध घेणाऱ्या पथकाला पवई डॅमजवळील दगडाच्या कपारीत एक मुलगा अडकून पडल्याचे आढळून आले.

“अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले असून, राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मुसळधार पावसात धबधब्याखाली कपारीत अडकून पडल्याने बुडून पोटात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.” असे पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!