हिरे व्यापाऱ्याची दीड कोटीची फसवणूक करणाऱ्या पवईतील दाम्पत्य आणि मुलीवर गुन्हा दाखल

सूरत येथील एका हिरे व्यापाऱ्याला आयात डायमंड लेझर कटिंग मशीन देण्याचे आश्वासन देत पवईतील एका जोडप्याने आणि त्यांच्या मुलीने १.५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आरोपी जोडपे हे फिर्यादी हिरे व्यापारी यांच्या कार्यालयात २८ ऑगस्ट २०२१ रोजी लेझर कटिंग मशीन आयात करणार्‍या कंपनीचे मालक म्हणून भेटले होते. यावेळी वलसाड येथे त्यांच्या मुलीची अशी कंपनी असून, मशीनसाठी १.३० कोटी रुपये खर्च येईल असे सांगतानाच कमिशन म्हणून १५ लाख रुपये अधिक मागितले होते.

डिसेंबर २०२१ मध्ये, हिरे व्यापारी यांनी मशीन बुक करून आरोपी यांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये ट्रान्सफर केले होते. तसेच उर्वरित रक्कम भरण्यासाठी त्यांनी तामिळनाडू मर्कंटाइल बँकेच्या सुरत शाखेतून ९५ लाखांचे कर्ज घेत १७ मार्च २०२२ पर्यंत एकूण १.५० कोटी रुपये दिले.

पुढील १६-१८ आठवड्यांत हे मशीन त्यांच्या कंपनीला देण्याचे या जोडप्याने मान्य केले होते. मात्र मशीनची डिलिव्हरी होऊ शकली नाही, याबाबत व्यापाऱ्याने जोडप्याकडे चौकशी केली असता रशिया- युक्रेन युद्धामुळे मशीन स्वित्झर्लंडच्या बंदरात अडकले असल्याचे सांगितले.

सतत पाठपुरावा करूनही उत्तर मिळत नसल्याने व्यापाऱ्याने दाम्पत्याने दिलेल्या पत्त्यावर भेट दिली असता तेथे अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच हिरे व्यापाऱ्याने कटरगाम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४०९ आणि १२० ब अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!