केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न

पवईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने २५ डिसेंबर रोजी भारत सरकार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पवईमध्ये भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले होते. सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पारितोषिक विजेत्या संघाला देण्यात आले.

स्पर्धेत सहभागी १२ संघामधील निटी येथील ‘टक्कर लेव्हन’ हा संघ या स्पर्धेत विजेता संघ व ‘ओम साई इलेव्हन’ पवारवाडी हा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व अकरा हजार रोख रक्कम व उपविजेता संघाला सन्मानचिन्ह व आठ हजार रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री अविनाश महातेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रिपाई मुंबईचे अध्यक्ष गौतम भाऊ सोनावणे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देण्यात आली. विनोद लिपचा, बाळ गरूड, भाऊ पंडागळे, किशोर गायकवाड, विनोद गाडे, राहुल गाडे, मोहित शिरसाट, जनक कोल्हे, प्राशिक गरूड, सतिश मिसाळ इत्यादी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!