पवईत धावत्या मोटारसायकलला आग

@रविराज शिंदे

पवई जेवीएलआरवरील गणेशनगर गणेशघाट येथे गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारसायकलला अचानक भीषण आग लागल्याची घटना शुक्रवार, २० मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता घडली. सुदैवाने चालक बचावला असून, मोटारसायकल जळून खाक झाली आहे.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत झाल्टे नामक तरुण आपली यामाहा मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ डीजे ३११५ वरून गांधीनगरच्या दिशेने जात होता. पवईतील गणेशनगर गणेश विसर्जन घाटाजवळ येताच मोटारसायकल घसरल्याने त्याचा ताबा सुटला आणि गाडी पडली. तो उठून सावरणार तेव्हढ्यातच मोटारसायकलने पेट घेतला आणि काही वेळातच संपूर्ण दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी गेली.

स्थानिकांच्या आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातून गाडीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत मोटरसायकलने भीषण पेट घेतला असल्यामुळे या घटनेत मोटरसायकल पूर्णपणे भस्मसात झाली आहे. या घटनेमुळे जेवीएलआरवर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गाडी घसरल्याने घर्षण निर्माण झाल्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

‘घडलेल्या संपूर्ण घटनेची प्रशांत याने पोलिसांना माहिती देतानाच त्याला कोणीच ठोकर मारली नसून, त्याची कोणा विरोधातच तक्रार नसल्याचे त्याने आम्हाला सांगितले असल्याचे” पवई पोलिसांनी यावेळी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!