पवईत पाण्याच्या टँकरला आग

पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर (जेविएलआर) धावत्या पाण्याच्या टँकरला आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून, रस्त्यावर प्रवास करणाऱ्या लोकांच्या मदतीने दुसऱ्या एका टँकरमधील पाणी वापरून आग विझवण्यात आली.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका वॉटर सप्लाय कंपनीचा टँकर हा पाणी घेवून जेविएलआर वरून अंधेरीच्या दिशेने जात होता. मरीन इन्स्टिट्यूट समोर टँकर येताच गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी बाजूला लावत आपल्या इतर सहकाऱ्यांना याची माहिती दिली.

“टँकरमधून आग निघत असल्याचे पाहताच प्रवाशांनी सोबत येणाऱ्या दुसऱ्या एका टँकरमधून पाणी घेत आगीवर नियंत्रण मिळवले,” असे याबाबत बोलताना प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!