पवई, चांदिवलीत ३ ठिकाणी ‘आपला दवाखाना’; मोफत उपचार

मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणजेच एचबीटी क्लिनिकच्या संख्येने शंभरी ओलांडली असतानाच यातील ३ दवाखाने हे पवई आणि चांदिवली परिसरात आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर किमान १०० ‘आपला दवाखाना’ सुरु होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आपला दवाखान्यांची एकूण संख्या १०६ इतकी झाली असल्याची घोषणा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली.

पवई येथील तिरंदाज क्लिनिक हे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून घोषित झाले आहे. तिथे सर्व आरोग्य तपासण्या होतील. तर चांदिवली येथील संघर्षनगर येथील चांदिवली क्लिनिक आणि बुमरँग येथील तुंगा हेल्थ पोस्ट देखील आपला दवाखाना म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आपला दवाखान्याच्या सेवेत मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेचे एक्स-रे, सोनोग्राफी सारख्या चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे पालिकेच्या दरात वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत. विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

शिवसेनाप्रमुख (दिवंगत) बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरुवातीला ५२ दवाखाने सुरु करण्यात झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आणखी २० दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. तर बुधवारी २५ जानेवारी रोजी आणखी ३४ नवीन दवाखान्यांची भर यात पडली आहे.

आपला दवाखान्यांत आतापर्यंत २ लाख ५९ हजार २३४ मुंबईकरांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला आहे. यापैकी २ लाख ४७ हजार ५७४ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला आहे. सोबतच ११ हजार ६६० रुग्णांनी पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्रे येथे दंत चिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला आहे.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!