पवईत टेम्पोखाली आल्याने मोटारसायकल चालकाचा मृत्यू

एका मोटारसायकल चालकाचा टेम्पोखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पवईत घडली. साकीविहार रोडवर हा अपघात घडला. मोहम्मद खान (२०) असे अपघातात मृत्यू पावलेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी टेंम्पो चालक रामसुंदर यादव (२९) याला अटक केली आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान आपला अजून एक मित्र मोहम्मद कुरेशी (२०) याच्यासोबत मोटारसायकलवरून साकीविहार रोडवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. ज्यामुळे मोटारसायकलवर असणारे दोघेही रस्त्यावर पडले, ज्यात खान गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

टेम्पो चालक रामसुंदर यादव याला पवई पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत होण्याच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes