आदित्य ठाकरेंनी घेतले चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज, गुरुवार ०८ सप्टेंबरला चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी ठाकरे यांच्यासोबत माजी परिवहन मंत्री अनिल परब, माजी नगरसेवक ईश्वर तायडे, माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, युवासेना विभाग अधिकारी बालाजी सांगळे आणि शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी संघटना मजबूत करत तिला वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यभर विविध भागात दौरे करत ते संघटना मजबूत करत आहेत. तसेच जनसंपर्क वाढवण्याचे काम करत आहेत. याचाच भाग म्हणून गुरुवारी त्यांनी चांदिवली येथील चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला. यावेळी त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!