आज पवईत रंगणार आंबेडकरी कवी संमेलन

आज (५ मे २०१९) पवईत प्रथमच आंबेडकरी कवी संमेलन रंगणार आहे. भिमसेना पवई प्रतिष्ठाण आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जंयती निमित्त आयआयटी मार्केट परिसरात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हे आंबेडकरी कवी संमेलन होत आहे. वर्षा भिसे, रेशमा राणे, विलास बसवंत, प्रज्ञा रोकडे, भट्टू जगदेव, संगम पाईपलाईनवाला, वीणा भालेराव, विजय ढोकळे, साहेबराव कांबळे, दिपक डिंगणकर, सुचिता कांबळे, तुषार नेवरेकर आदी निमंत्रित कवी-कवयित्री यावेळी आपल्या आंबेडकरी कविता सादर करून समाज प्रबोधनचा वसा जपणार आहेत.

“मानवंदना भिमाला” हा भिम गीतांचा संगीतमय नजराणा देखील ठेवण्यात आला आहे. सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत. चैतन्यनगर, भाजी मार्केट, आयआयटी मार्केट पवई हा कार्यक्रम रंगणार आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes