डॉक्टरला प्रीमियमच्या भरण्यासाठी आलेल्या फोन कॉलने १.३५ लाख पळवले

सायबर गुन्हेगारीने आपले जाळे चांगलेच पसरवले असून, पवईतील ६२ वर्षीय ईएनटी तज्ज्ञ याची नुकतीच शिकार झाली आहे. बनावट टेलिकॉलरने पिडीतने घेतलेल्या विम्याची संपूर्ण माहिती देत प्रीमिअमची रक्कम त्वरित नाही भरली तर पॉलिसी लैप्स होवू शकते असे भासवत बँक खात्यात पैशांचे हस्तांतरण करण्यास सांगून १.३५ लाखाचा गंडा घातला आहे.

६ मार्चला पिडीत डॉक्टरला अनिता कोठारी आणि रेहान नामक दोन टेलिकॉलरनी अनेकदा फोन करून ते एका नामांकित विमा कंपनीतून बोलत आहेत, त्या कंपनीचा विमा त्यांनी घेतला आहे आणि त्याची प्रीमिअम भरणे बाकी असल्याचे सांगितले. मला कॉलरवर विश्वास ठेवण्यास भाग पाडण्यात आले कारण त्यांच्याकडे माझे गोपनीय तपशील होते जे मी विमा कंपनीला माझा विमा उतरवताना दिले होते. असे पिडीत डॉक्टरने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

पिडीतने पेमेंट करण्यासाठी ईसीएसचा अर्ज केला होता. मात्र, ईसीएसद्वारे भरणा केलेली रक्कम विमा खात्यात जमा होण्यास वेळ लागतो आणि त्या काळात तुमची पॉलिसी प्रीमिअम भरण्याची तारीख निघून गेल्याने लैप्स होणार असे समोरील व्यक्तीने सांगितले. दुपारी १२ ते ४ या वेळेत मिळालेल्या या फोन कॉलसच्या दरम्यान पिडीत डॉक्टर ही आपल्या क्लिनिकमध्ये होती.

विम्याची वेळी दिलेली संपूर्ण माहिती टेलीफोनवरील व्यक्तीने दिलेल्या माहितीशी जुळत असल्याने पिडीताने त्वरित दिलेल्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा करताच पिडीताने आपल्या विमा कंपनीला फोन करून पैसे जमा झाले आहेत का याची चौकशी केली असता, पैसे त्यांच्या विमा खात्यात जमा न-झाल्याची माहिती समोर आली. ‘आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

‘ग्राहकांचा विमा कंपनीतील डेटा लिक करण्यात आलेला आहे का? ज्यामुळे फसवणूक करणारऱ्या लोकांना फसविण्यास मदत मिळत आहे याची माहिती आम्ही मिळवत आहोत. दरम्यान आम्ही पैसे हस्तांतरित करण्यात आलेल्या बँक खात्याचा तपशील, पैसे कुठून काढण्यात आले याच्या माहितीची मागणी केली आहे. बँक किंवा एटीएममधून पैसे काढले असल्यास तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा सुद्धा प्रयत्न करीत आहोत’, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले ‘लोकांना हे लक्षात घ्यायचे आहे की कोणतीही आर्थिक संस्था, बँक आपल्या ग्राहकांना कोणत्याही तपशीलांसाठी कॉल करीत नाही. जर एखाद्याला असे कॉल प्राप्त झाले तर त्याने ताबडतोब संबंधित संस्थेशी संपर्क साधावा आणि कोणताही व्यवहार करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी.

फसवणुकीसाठी भादवि कलम आणि माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत पवई पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes