पवईत संत रविदास जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

@अवि हजारे

संत शिरोमणी रविदास संघटनेतर्फे २५ फेब्रुवारी रोजी पवईच्या शिवकृपा इमारतीजवळील चौकात संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात महापुरुषांचे विचार आणि त्यांनी सांगितलेला मार्गावर विचारमंथन करण्यात आले.

या प्रसंगी विचारमंचावर स्थानिक भाजप नगरसेविका वैशाली पाटील, अखिल भारतीय परिवार महाराष्ट्र महासचिव विरेंद्र धिवार, पवई रिपाई नेते बाळ गरूड, ‘आवर्तन पवई’च्या संपादिका सुषमा चव्हाण, लक्ष्मण धवन गुरूजी, उद्योजक डॉ जयेश खाडे, ज्येष्ठ शिवसैनिक श्रीधर पावसकर, शाखाप्रमुख सचिन मदने, पवईच्या माजी महिला शाखा संघटिका सुरेखाताई चव्हाण, माजी शाखाप्रमुख उदय शिर्के, संभाजी ब्रिगेड मुंबई जिल्हा संघटक भुपेंद्र भोसले आणि युथ पॉवर संघटनेचे ईशान्य मुंबई संघटक विलास तागतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाहीर शिवाजी तुपाविहीरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज ते संत रविदास व्हाया डॉ बाबासाहेब आंबेडकर असा धागा पकडत समाज जीवनातील योगदान आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील त्यांचे कार्य या विषयावर प्रबोधनात्मक गीते सादर केली.

आयआयटी, रमाबाई आंबेडकरनगर येथील रस्त्याला संत शिरोमणी क्रांतिसूर्य संत रविदास यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नागरिकांकडून आला असून, आपण याचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी बोलताना स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश जाधव, तुषार पावस्कर, सचिन सातपुते, सोनी कांबळे, संगीता जाधव, छाया कांबळे आदी आयोजकांनी परिश्रम घेतले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!