अटल फुटबॉल चषक: भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पवईत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

शनिवार २० नोव्हेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पवईत हिरानंदानी येथे अटल फुटबॉल चषकचे आयोजन करण्यात आले होते. नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पवईत खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघात झालेल्या या खेळाच्या स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेत ब्रदर्स फुटबॉल क्लब विजेता तर हस्टलरस फुटबॉल क्लब उपविजेता संघ ठरले. मोहित गंभीर हा बेस्ट गोलकिपर तर शोएब हा मोस्ट गोल स्कोरर ठरला.

पवई आणि आसपासच्या परिसरातील फुटबॉलपटू मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत सहभागी झाले होते. योगेश शुक्ला, संजीव तिवारी, नीरज सिंग, मंदार सोहनी आणि आकिब सिद्दीकी हे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक होते.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: