आयआयटी कामगाराचे एटीएममधून चोरट्याने उडवले २० हजार

एटीएममधील सिसिटीव्ही कॅमेरा बंद असल्याने आणि सुरक्षा रक्षक नसल्याने तपासाची सूत्रे वाऱ्यावर. बँक अधिकाऱ्याचा सहकार्य करण्यास नकार

बँकेने सोनावणे यांना दिलेला चोरट्याचा फोटो

आयआयटी पवई येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममधून पवईकर संतोष सोनावणे यांचे २० हजार रुपये चोरट्यांनी उडवल्याची घटना घडली आहे. सोनावणे यांनी याबाबत एसबीआय आणि पवई पोलीस ठाणे यांना लेखी तक्रार केली असून, तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

आयआयटी पवईमध्ये काम करणाऱ्या सोनावणे यांना आर्थिक देवाण-घेवाणीसाठी २० हजार रुपयांची गरज असल्याने शनिवारी १६ डिसेंबर रोजी त्यांनी इन्स्टिट्यूटच्या बाहेरच असणाऱ्या एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते पैसे त्यांना न-मिळताच चोरट्याच्या हाती लागले आहेत.

सोनावणे यांनी १६ डिसेंबरला बँकेला दिलेले पत्र

“४.१५ च्या सुमारास मी एटीएममध्ये जावून पहिल्यांदा पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया केली परंतु एटीएममधून पैसे बाहेर आलेच नाहीत. मी पुन्हा एकदा पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी रक्कम टाकण्याची स्क्रिनच समोर येत नसल्याने कॅन्सलचे बटन दाबून व्यवहार घडला नाही किंवा पैसे बाहेर निघालेले नाहीत याची खात्री करून तेथून निघून गेलो.” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना सोनावणे यांनी सांगितले.

सोनावणे यांनी १९ डिसेंबरला पवई पोलीस ठाण्यास दिलेले तक्रार पत्र

ते पुढे म्हणाले “मी थोडा दूर गेलो असेन कि मला माझ्या खात्यातून विस हजार रुपये निघाल्याचा एसएमएस मिळाला. मी त्वरित एटीएमकडे धाव घेतली मात्र तेथे कोणीच नव्हते. एटीएमला लागूनच असणाऱ्या बँकेच्या आयआयटी शाखेत जावून माझ्या खात्यातून पैसे निघाल्याचा आणि ते मला मिळाले नसल्याचे तोंडी आणि लेखी अशा स्वरुपात सांगितले असता त्यांनी पैसे निघाले नाहीत तर सोमवारी पैसे पुन्हा तुमच्या खात्यात जमा होतील असे मला सांगितले. मात्र, सोमवारी पैसे खात्यात पुन्हा जमा न-झाल्याने मी बँक अधिकाऱ्यांकडे जावून चौकशी केली असता त्यांनी शनिवारी व्यवहार घडला होता आणि पैसे मिळाले असल्याचे सांगितले. पैसे मला मिळाले नसून, आपण सिसिटीव्ही पाहण्याची मागणी करताच त्यांनी एटीएमचा सिसिटीव्ही बंद आहे असे मला उत्तर दिले. पुढे मी त्यांच्यावर जोर टाकल्यानंतर त्यांनी एटीएम मशीनमधील कॅमेऱ्याने कैद केलेला पैसे काढणाऱ्या व्यक्तीचा एक फोटो मला काढून दिला. मात्र बँक अधिकारी आता मला पुढील मदत करण्यास पूर्णपणे नकार देत आहेत.”

बँकेकडून मिळालेला फोटो, आलेला एसएमएस यांच्या आधारे सोनावणे यांनी पवई पोलिसांना एक लेखी तक्रार दाखल केली आहे ज्याच्या आधारावर सध्या पवई पोलीस तपास करत आहेत.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!