Author Archive | आवर्तन पवई

police MCOCA

पवईतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर पवई पोलिसांची मोक्का अंतर्गत कारवाई

पवईतील फिल्टरपाडा, नीटी भागात दहशत पसरवून लोकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या आणि खंडणी देण्यास नकार देणाऱ्या लोकांचे अपहरण करून जबरदस्ती खंडणी वसूल करणाऱ्या गुन्हेगारी टोळीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकून मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली आहे. पवई पोलीस ठाणे हद्दीत मोक्का अंतर्गत केली जाणारी ही पहिलीच कारवाई आहे. मुख्य आरोपी अमीन मोमीन खान, […]

Continue Reading 0
accident filterpada

भरधाव एसयुव्हीने चिमुरड्याला उडवले; जागीच मृत्यू

भरधाव वेगात धावणाऱ्या एका एसयुव्ही कारने फिल्टरपाडा येथे ४ वर्षाच्या एका लहान मुलाला उडवल्याची घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. अरहान रमजान खान (०४) असे मुलाचे नाव असून, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्टरपाडा बेस्टनगर येथे राहणाऱ्या अरहानचे घर हे रस्त्यापासून काहीच अंतरावर आहे. दुपारी तो घराबाहेरील […]

Continue Reading 0

महिलेच्या विनयभंग प्रकरणी पळून गेलेल्या चौघांना अटक

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील फुटपाथ ब्रिज वर एका महिलेशी अश्शील वर्तन करत, याचा जाब विचारणाऱ्या भावाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी पळून गेलेल्या चार आरोपींना पवई पोलिसांनी अटक केली आहे. मुलुंड परिसरात राहणारी तक्रारदार महिला रविवारी सायंकाळी हिरानंदानी येथील मदिरा अंड माईस रेस्टोरंट मध्ये तिच्या भाऊ व मैत्रिणी सोबत जेवणासाठी आली […]

Continue Reading 0
fraud

इंटरनेटवर नंबर मिळालेल्या पॅकर्स आणि मुव्हर्सने कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीने पाठवलेली एसयुव्ही कार पळवली

पवई येथे राहणाऱ्या कोस्टगार्ड अधिकारी यांच्या पत्नीला इंटरनेटवर मिळालेल्या मूव्हर्स आणि पॅकर्स सेवा पुरवणाऱ्या कंपनीने ठगल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात आपल्या पतीच्या मित्राला मिझोरम येथे स्कोर्पिओ, एसयुव्ही कार पाठवण्याचे काम अधिकाऱ्याच्या ३४ वर्षीय पत्नीने इंटरनेटवर नंबर मिळालेल्या अग्रवाल ऑल इंडिया मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीला सोपवले होते. एसयूव्हीच्या डिलीव्हरीचा मोबदला म्हणून ३३८०६ […]

Continue Reading 0
iit powai

मुंबई आयआयटीतील विद्यार्थीनीना विषबाधा

मुंबई आयआयटीमधील मुलींच्या हॉस्टेल क्रमांक १० मधील विद्यार्थीनीना गोड खाण्यातून विषबाधा झाल्याचे सोमवारी समोर आले आहे. ही विषबाधा शनिवारी झाल्याचे समोर येत असून, सुरुवातीला नाकारणाऱ्या आयआयटी प्रशासनाने सोमवारी सायंकाळी उशिरा मान्य केले. विषबाधेमुळे २५ विद्यार्थीनीना आयआयटीच्या अंतर्गत रुग्णालयात दाखल करून, उपचारानंतर सर्वांना सोडून देण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र शेवटची बातमी हाती आली तोपर्यंत काही […]

Continue Reading 0
transplant-deceased-building with decease

केसांच्या प्रत्यारोपणानंतर ५० तासांनी व्यावसायिकाचा मृत्यू

चांदिवली येथील ४३ वर्षीय व्यावसायिकाने चिंचपोकळी येथील खाजगी रुग्णालयात केलेल्या केसांच्या प्रत्यारोपणानंतर ५० तासांनी शनिवारी त्यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील लॉजिस्टीक व्यवसायाचे मालक श्रवण कुमार चौधरी यांना शुक्रवारी चेहऱ्यावर सूज येवून, गंभीर श्वासोच्छवासाची तक्रार जाणवू लागल्यानंतर हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी सकाळी ६.४५ वाजता मृत्यू झाला. साकीनाका […]

Continue Reading 0
phishing

आयआयटीकराच्या बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला

आयआयटी पवई भागात राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणाच्या खात्यातील पैसे चोरट्याने ऑनलाईन लांबवल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. एटीएममधून पैसे काढायला गेलेल्या तरुणाला ही बाब लक्षात येताच त्याने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पवई येथील आयआयटी परिसरात राहणारे अविनाश आगळे, आयआयटी मुंबई येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. इंडियन ओव्हर्सीस बँकेच्या पवई प्लाझा […]

Continue Reading 0
http://www.dreamstime.com/stock-photo-pair-motorbike-vector-sketch-couple-riding-motorcycle-image44262100

ओळखपत्र पाहण्याच्या बहाण्याने चोरी

दुचाकीवरुन आलेल्या दोन इसमांनी एका व्यक्तीला रस्त्यात अडवून ओळखपत्र दाखवण्यास सांगत त्याच्याजवळील २० हजार रुपये चोरून नेल्याची घटना पवईत रविवारी घडली. मुन्ना नुरमोहम्मद खान (४५) असे पीडित व्यक्तीचे नाव असून, त्याने मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी जमवलेले पैसे चोरट्यांनी लांबवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान अंधेरी पूर्वेतील एका ऑटोमोटिव्ह युनिटमध्ये काम करतो. दररोज किमान ९ नंतरच तो […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

वृद्धेला पोलीस असल्याचे सांगून २ लाखाचे सोन्याचे दागिने लांबवणारया भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात आपल्या मुलीच्या उपचारासाठी आलेल्या एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून, २ लाखाचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला अडीच महिन्यानंतर अखेर पोलिसांनी मालवणी येथून अटक केली आहे. गुलझार अली (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मालवणी येथे इस्टेट एजंटचे काम करतो. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधा गौंडर (६२) […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes