Author Archive | आवर्तन पवई

water issue powai

ऐन गणेशोत्सवात पवईकरांचे पाणी पळवले; रविवारी विजेचे झटके

@रविराज शिंदे, रमेश कांबळे गुरुवार पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. यामुळे सगळीकडे त्याची लगबग असतानाच पवईमधील जुनी पवई मानल्या जाणाऱ्या आयआयटी भागातील अनेक परिसरात शनिवारी आणि रविवारी पालिकेने कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय पाणी गुल केले. ही समस्या कमी होती की काय, रविवारी परिसरातील वीज सुद्धा गायब झाली. ऐन गणेशोत्सवात शनिवार – रविवारची सुट्टी गाठून आखलेल्या पवईकरांच्या […]

Continue Reading 0
Accident IIT Main Gate

आयआयटीजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू

@रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण आयआयटी  मेनगेटजवळ काल (शुक्रवारी) रात्री ७.३० वाजता झालेल्या अपघातात एका इसमाला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली. संजय सदानंद मयेकर (४३) असे या मृत इसमाचे नाव आहे. ओल्या रस्त्यावरून मोटारसायकल घसरून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे. पवई पोलीस त्याला चिरडणाऱ्या अज्ञात वाहनाचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहेत. यासंदर्भात पवई […]

Continue Reading 0
IMG_4058

दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]

Continue Reading 2
bharat band powai

भारत बंदला पवईत संमिश्र प्रतिसाद, पेट्रोलपंप बंद ठेवल्याने वाहनचालकांची कोंडी

@रविराज शिंदे, रमेश कांबळे इंधन दरवाढी विरोधात सोमवारी (१० सप्टेंबर) विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदचे संमिश्र पडसाद पवईतही पहायला मिळाले. येथील कॉग्रेस, मनसे, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेत, निदर्शने करत जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर (जेविएलआर) आयआयटी मेनगेट येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवणेच व्यापाऱ्यांनी पसंद केले होते. […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत विधी शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पवईतील हिरानंदानी येथे असणाऱ्या महाराष्ट्र नॅशनल लॉ-युनिवर्सिटीमध्ये विधी शाखेत शिकणाऱ्या सायली मेश्राम (२०) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायली लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. पवई पोलिस तिच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आपल्या सहकारी विद्यार्थीनीसोबत हॉस्टेलमध्ये राहत होती. बुधवारी तिची मैत्रीण वैय्यक्तिक कामानिमित्त बाहेर गेली होती. […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

आईला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा छोट्या भावाने केला खून

नशेच्या आहारी जावून आपल्या आईला दररोज मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा त्याच्याच छोट्या भावाने खून केल्याची घटना साकीनाका येथे घडली आहे. ब्रिजभान संतू लोध असे मृत तरुणाचे नाव असून, साकीनाका पोलिसांनी त्याचा छोटा भाऊ सूर्यभान ऊर्फ मोनू (२६) याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काजूपाडा येथे सोनू आणि मोनू हे दोघे […]

Continue Reading 0
rakshabandhan PPS

बंध रेशमाचे, बंधन रक्षणाचे

श्रावण पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भारतीय संस्कृतीत बहिण आपल्या भावाला आपल्या बंधू प्रेमाचे प्रतिक आणि दीर्घायुष्यासाठी राखी बांधते, तर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पवईतील महिला आणि विद्यार्थिनीनी खऱ्या अर्थाने भावाचे कर्तव्य निभावणाऱ्या आणि केवळ आपल्याच नव्हे तर देशातील प्रत्येक बहिणींच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या वर्दीतील रक्षक पोलीस आणि सैनिक यांना राखी बांधत हा सण […]

Continue Reading 0
प्रवीण बस्तानव नरोना, डेरिक बस्तानव नरोना, सेविअर जून नरोना आणि विल्सन अन्थोनी सवेरी मुथू

खोट्या कागदपत्रांच्या आधारे लोन काढून मुंबईकरांना लाखोंचा चुना लावणाऱ्या चौघांना पवईत अटक

खोटी कागदपत्रे तयार करून मुंबईकरांच्या नावाने बँकेतून लोन काढून लाखोंचा गंडा घालणाऱ्या चौघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण बस्तानव नरोना, डेरिक बस्तानव नरोना, सेविअर जून नरोना आणि विल्सन अन्थोनी सवेरी मुथू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवई पोलिसांनी आत्तापर्यंत त्यांच्याकडून लोनच्या पैशातून घेतेलेल्या ३ मोटारसायकली, फ्रीज, टीव्ही आणि घरगुती वापराच्या इलेक्ट्रोनिक वस्तूंसह […]

Continue Reading 1
car

चोरट्यांनी आयआयटी पवईत हाफ मॅरेथॉनसाठी आलेल्या १२ लोकांच्या गाड्या फोडल्या

पवईतील आयआयटी येथे हाफ मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंच्या जवळपास १२ वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी पवईत घडली आहे. यावेळी चोरट्यांनी गाडीतील लॅपटॉप, मोबाईल, बॅग अशा मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पवईतील आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये आज (रविवारी) सकाळी हाफ मॅरेथॉन […]

Continue Reading 0
stf hiranandani

इलेक्ट्रिक पोलच्या बॉक्सची झाकणे चोरणाऱ्या टोळीची हिरानंदानी एसटीएफतर्फे धरपकड

पवईतील पथदिव्यांच्या इलेक्ट्रिक बॉक्सची झाकणे चोरी करून विकणाऱ्या टोळीतील तिघांना काल दुपारी हिरानंदानी (कमांडो) एसटीएफ पथकाने चोरी करताना रंगेहाथ पकडून, पवई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्याजवळ त्यावेळी १० पेक्षा जास्त अल्युमिनियमची झाकणे आढळून आली आहेत. तिन्ही तरुण हे विशीच्या वयातील असून, महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. याबाबत हिरानंदानी एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात परिसरात लावण्यात आलेल्या […]

Continue Reading 0
kidnap school

पवईत शाळेजवळ विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न?

पवई आयआयटी येथील एका नामांकित शाळेबाहेरून एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी पवईत घडली. याबाबत शाळा प्रशासनाने पवई पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई, आयआयटी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीत शिकणार अनिकेत (बदलेले नाव) हा दुपारी १२.४५ वाजता शाळा सुटल्यानंतर आपल्या […]

Continue Reading 0
IMG_2483

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये रंगली पालकांची ‘फ्लॅग मेकिंग’ स्पर्धा

पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात. त्यांना बघूनच मुले त्यांचे अनुकरण करत असतात, ही बाब लक्षात घेत पवई इंग्लिश हायस्कूलतर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत फ्लॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी वायुसेना अधिकारी दिनेश नायर आणि महिला उद्योजिका सुनिता विनोद यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्वातंत्र्य दिवस म्हटले की प्रत्येक शाळेत रंगतात त्या म्हणजे […]

Continue Reading 1
¬the-constitution-burnt-down-powaiites-protest-front-of-police-station

संविधान जाळल्याच्या निषेधार्थ पवई पोलीस ठाण्यावर धडकला युवकांचा मोर्चा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे भारतीय जनतेच्या अस्मितेचे प्रतिक असलेले भारतीय संविधान जाळण्यात आले. भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या कुप्रवृत्तीचा देशाच्या कानाकोपऱ्यात निषेध नोंदवला जात असून, पवईमधील सर्व संस्थांनी मिळून पवई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला. यावेळी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांना निवेदन […]

Continue Reading 0
56th Convocation of IIT Bombay 1 (2)

स्टार्टअपची क्रांती देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहेत. आज जग आयआयटींना युनिकॉर्न स्टार्टअप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे, असे गौरव उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. शनिवारी आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये कॉन्वोकेशन हॉलमध्ये पार पडलेल्या आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते […]

Continue Reading 0

आजारपणाला कंटाळून इसमाची रेल्वेखाली आत्महत्या

रविराज शिंदे दीर्घ आजाराने त्रस्त झालेल्या पवईतील एका ५० वर्षीय इसमाने कांजूरमार्ग रेल्वे स्थानक येथे लोकल खाली उडी घेवून, आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. आद्याप्रसाद यादव असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असून, ते पवईतील महात्मा फुले नगर येथे आपल्या परिवारासोबत राहत. तीन मुले आणि बायको सोबत राहणारे यादव काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त असल्याची माहिती […]

Continue Reading 0
IMG-20180807-WA0018

कांजूरच्या हूमा सिनेमात मनसेचे आंदोलन

रविराज शिंदे मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाण्यास आणि मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे दर कमी करण्याबाबत विधिमंडळात निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याला बाजूला सारत राजरोसपणेआपल्याच तालात चालणाऱ्या मॉल विरोधात मनसेने इशारा देवूनही काहीच परिणाम जाणवत नसल्यामुळे, मनसेने मंगळवारी हुमा सिनेमा येथे व्यवस्थापना विरोधात घोषणा देत आंदोलन केले. मल्टिप्लेक्स मॉलमधील खाद्यपदार्थाच्या दर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेल्या खळखट्याक आंदोलनाची […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!