Author Archive | आवर्तन पवई

eco ganesha hng

गलेरियात भरली यंग इन्वायरमेंटची ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा

गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी, निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंट ग्रुपच्यावतीने, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा हिरानंदानी येथील गलेरिया मॉलमध्ये भरवण्यात आली. या वेळी ३०० पेक्षा जास्त मुलांनी सहभाग नोंदवून, पवई तलाव आणि मिठी नदीच्या पात्रातून निघालेल्या मातीच्या साहय्याने गणेशमूर्ती स्वयंनिर्मितीचा आनंद घेतला. कार्यशाळेस अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आम्ही स्वतः पर्यावरण […]

Continue Reading 0
IMG_5131

नोबेल पुरस्कार विजेते सत्यार्थी यांच्या उपस्थितीत आयआयटी मुंबईचा ५३वा दीक्षांत समारंभ संपन्न

“समाजातील केवळ ठरावीक घटकांसाठीच नव्हे, तर प्रत्येकाला परवडेल असे नव-नवीन तंत्रज्ञान तयार करण्याचे आव्हान आयआयटीयन्सनी स्वीकारायला हवे. आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहाण्याआधी देशाच्या भविष्याची स्वप्ने पहा, ती पूर्ण करा. समस्यांकडे फक्त आपल्या देशाचा प्रश्न अशी विभागणी न करता, हे संपूर्ण जग म्हणजे एक देश म्हणून विचार करण्याची गरज आहे.” असे आवाहन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश […]

Continue Reading 0
bomb scare

हिरानंदानीत बॉंम्ब’बोंब, बॉंम्बशोधक पथकाच्या हाती कपडे, बूट आणि वैयक्तिक सामान

हिरानंदानीतील एका व्यावसायिक इमारतीत, रात्रीच्या वेळी एक अनोळखी इसम ‘मी या कंपनीत काम करतो माझे वर काम आहे जाऊन येतो’, म्हणून सुरक्षारक्षकाजवळ बॅग सोडून गेला तो बराचवेळ परत आलाच नाही. उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर सुद्धा जेव्हा कोणीच बॅग घेऊन जाण्यास आले नाही, तेव्हा कदाचित हा घातपाताचा प्रयत्न तर नाही ना असा अंदाज बांधून प्रथम पोलीस आणि […]

Continue Reading 0
galleria1

अखेर गलेरियाने घेतला मोकळा श्वास, अतिक्रमणाचा विळखा खरेच हटला आहे का?

गेली अनेक वर्ष हिरानंदानीतील गलेरियात, दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अतिक्रमण करून दुकाने थाटल्यामुळे गलेरीयाचे मच्छीमार्केट होऊन गेले होते. ज्याच्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोक-प्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारीनंतर, पालिका प्रशासनाने पाठीमागील महिन्यात ‘निष्कासन नोटीस’ देऊन ‘अतिक्रमण हटवा नाही तर कारवाईला सामोरे जा’, असे बजावल्यामुळे अखेर दुकानदारांना आपले अतिक्रमण हटवावे लागलेले आहे आणि गलेरीयाने मोकळा श्वास घेतला आहे. परंतु येत्या […]

Continue Reading 2
dhammadip

एकमेकांवर टिकाटिपण्णी करण्यापेक्षा आंबेडकरी चळवळ गतिमान करा – डॉ सुरेश माने

रविराज शिंदे  “आंबेडकरी चळवळीतील पक्षात बेफाम ताटातूट झालेली आहे. निवडणूक काळात आंबेडकरी चळवळीतील एकही पक्ष आणि एकही माणूस जिंकून येत नाही, ही शोकांतिका आहे. सर्व गटातटांनी आता एकत्रित येण्याची गरज आहे. फक्त एकमेकांवर टीका न करता, आंबेडकरी चळवळ गतिमान कशी होईल याची मांडणी केली पाहिजे” असे स्पष्ट मत मुंबई विद्यापीठाचे माजी विधीप्रमुख डॉ. सुरेश माने […]

Continue Reading 0
1

कचऱ्याच्या साम्राज्याने पंचकुटीरकर हैराण, कचऱ्याचे डबे हटवण्याची स्थानिकांची मागणी

पंचकुटीर परिसरामध्ये सुरक्षा भिंतीला लागून बनवलेल्या कचरापेटीतून कचरा बाहेर वाहून परिसरात घाण, दुर्गंधी आणि आजार पसरत असल्याने पंचकुटीरवासी हैराण झाले आहेत. या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून, लवकरात लवकर त्या ठिकाणचे कचऱ्याचे डबे हलवण्याची मागणी आता परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे. तसे न झाल्यास, नागरिकांकडून हे कचऱ्याचे डबे घेऊन पालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला […]

Continue Reading 0
banner

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने पवईमध्ये जाहिर परिसंवाद व काव्य स्पर्धेचे आयोजन

पवईमध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या धम्मदीप सोशल​​ ॲण्ड कल्चरल असोसिएशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने दि. ५ ऑगस्ट २०१५ रोजी सायंकाळी ४ वाजता पवई जैन मंदिर हॉल, आय आय टी मार्केट, पवई येथे ‘कहीं हम भूल ना जाये’ काव्य स्पर्धेचे आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले […]

Continue Reading 0
road

पंचसृष्टीकरांना प्रतिक्षा ‘अच्छे दिन’ची

उखडलेले रस्ते, वाहतुकीची कोंडी, सोनसाखळी, मोबाईल चोरी, पथ दिव्यांची कमतरता, बरोबरच मूलभूत सुविधांसाठी गेली अनेक वर्ष प्रशासनाशी लढाई करत असलेल्या पंचसृष्टी नागरिकांना, मोदी सरकारच्या राज्यात तरी आपल्याला या सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी येथील स्थानिक मूलभूत सुविधा आणि अनेक अडचणींचा सामना करत अजूनही अच्छे दिन ची वाट पाहत […]

Continue Reading 0
प्राणीमित्र बचावकार्य करताना

पवईच्या नीटी भागात मगर पोहचल्याने खळबळ, बचावकार्यानंतर तुलसी तलावात सोडण्यात यश

बुधवारी ११ फुट लांब मगर पवईतील नीटी भागात पोहचल्याने एकच खळबळ माजली. मगर जवळपास असणाऱ्या आदिवासी आणि रहिवाशी भागात पोहचण्याची शक्यता असल्याने, प्राणीमित्र संघटनेच्या १२ लोकांच्या मदतीने पाच तासाच्या बचावकार्यानंतर तिला सुखरूप तुलसी तलावात नेऊन सोडण्यात आले. ‘तलावात मगरी आहेत, पाण्यात उतरू नये, सावधानता बाळगा’ असे संदेश देणारे फलक पवई तलावा जवळील अनेक भागात लावलेले […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes