युवतीला पाहून हिरानंदानीत रिक्षा चालकाचे अश्लील वर्तन

हिरानंदानी परिसरात जॉगिंगसाठी बाहेर पडलेल्या १९ वर्षीय युवतीसमोर एका ऑटोरिक्षा चालकाने अश्लील वर्तन केल्याची तक्रार युवतीने केली आहे. घटनेची या युवतीने ट्विटद्वारे पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

पवईतील हिरानंदानी भागात जॉगिंगसाठी बाहेर पडलेल्या १९ वर्षीय युवतीसमोर एका ऑटोरिक्षा चालकाने तिला पाहत अश्लील वर्तन केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. युवती मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी असून, घटनेनंतर या युवतीने ट्विटद्वारे पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्वरित पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानीत राहणारी १९ वर्षीय तरुणी शनिवारी रात्री ११.५४ वाजता जॉगिंगसाठी बाहेर पडली होती. ती धावत धावत जोगेश्वरी विक्रोळी लिंकजवळ पोहचल्यावर त्याच रोडवरून परत धावत धावत हिरानंदानीकडे येत असताना ती डेल्फी इमारतीजवळ एका बँकेच्या एटीएमजवळ पायऱ्यांवर बसली.

“मी तिथे बसून माझा मोबाईल चाळत होते. थोड्या वेळाने मी चेहरा वर करून पाहिले असता, एका रिक्षामध्ये बसून एक व्यक्ती माझ्याकडे पाहत अश्लील वर्तन करत होता. त्या व्यक्तीने रिक्षाचालकाचे कपडे घातले होते”, असे पोलिसांना दिलेल्या माहितीत तरुणीने सांगितले.

त्याला अश्लील वर्तन करताना पाहून तरुणी भेदरली आणि तिने तिथून पळ काढला. “तरुणी घाबरली असल्याने ती ना चालकाला सामोरी गेली, ना ही ऑटोरिक्षाचा नंबर लिहून घेऊ शकली” असे पोलीस सूत्रांनी याबाबत बोलताना सांगितले.

ही घटना अत्यंत गंभीर आहे. घटना घडली त्याच्या आसपासच्या भागात अनेक कार्यालये आणि इमारती आहेत. आम्ही तिथे उपलब्ध असणाऱ्या सीसीटीव्ही फूटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. परिसरातील सर्वच ऑटोरिक्षा चालकांची चौकशी सुरू असून, उपलब्ध माहिती आणि तरुणीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes