प्रेम आणि आठवणींमध्ये चिंब करायला “बरसात आली”

बरसात आली.

पाऊस म्हंटलं की आठवतात चहा-भजी आणि पावसाची गाणी. आणि महाराष्ट्राचा लाडका गायक मंगेश बोरगावकरचा आवाज म्हणजे सोन्याहून पिवळे. पावसाच्या सुरुवातीलाच आकार मल्टीमिडीयान प्रेक्षकांसाठी मंगेश आणि मृन्मयीच्या आवाजात सुंदर सुरांची मेजवानी घेवून आली आहे. गाण्याचे नाव आहे बरसात आली.

बरसात प्रेमाची असते तशी आठवणींचीही असते. मंगेशने गायलेल्या या गाण्यातून प्रेक्षकांच्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. माथेरान भागात चित्रीकरण झाल्यामुळे पाऊस आणि निसर्गाचा खरेपणा या गाण्यातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मंगेश बोरगावकर नेहमीच वेगवेगळ्या कलाकृती प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतो. या पावसाळी बरसात आली च्या निमित्ताने मंगेश आणि त्याच्या टिमने सुरमय बरसात आपल्याला भेट दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने जरी दडी मारली असली तरी प्रेमाच्या आणि आठवणींच्या पावसात चिंब करणारं “बरसात आली” हे मराठी प्रेमगीत झी म्युझिक मराठी प्रस्तुतीने आणि आकार मल्टीमिडियाच्या निर्मितिने सर्वांसमोर आलं आहे. अल्पावधीतचं या गाण्याने युट्युबवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गीतकार संकेत मेस्त्री आणि सिद्धार्थ चितळे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या प्रेमगीताला भाग्येश पाटील या तरुण संगीतकाराने दिलेले संगीत लक्षवेधी ठरले आहे.

गायक मंगेश बोरगावकर

सा रे ग म प फेम सर्वांचा लाडका गायक मंगेश बोरगावकर आणि गायिका मृण्मयी भिडे यांच्या स्वरबद्ध गायनाने या गाण्याला जणू चार चांद लावले आहेत. रिद्धेश तरे या तरुण दिग्दर्शकाला अक्षय पाटील आणि क्षितिजा घोसाळकर सारख्या अनुभवी कलाकारांची साथ मिळाल्याने गाण्याचा व्हिडिओही उत्तम झाला आहे. कथा लेखक सुजित मेस्त्री, छायाचित्रकार जगदीश पाटील, संकलक रिद्धेश तरे यांसाेबत संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत प्रेक्षकांना प्रेमाच्या बरसातीमधे चिंब करण्यात यशस्वी झाली आहे.

हे गाणं युट्यूबसोबतचं अन्य ऑनलाईन ऑडिओ स्थळांवर उपलब्ध असून ते पाहण्याचे, ऐकण्याचे तसेच इतरांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन निर्माते सिद्धार्थ चितळे यांनी केले. प्रेक्षकांनी गाण्याला दाखवलेल्या प्रेमामुळे आणि गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यामुळे टीममधील सर्वचं प्रोत्साहित झाले असून यापुढेही यापेक्षाही वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती प्रेषकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचे दिग्दर्शक रिद्धेश तरे यांनी सांगितले.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!