पवईत पितृ दिनानिमित्त गरजू अंपगांना अन्नधान्य वाटप

प्रतिक कांबळे

कोरोनाच्या महासंकटाने बघता बघता बऱ्याच लोकांचा रोजगार नाहीसा झाला आहे. याचीच दखल घेत पवईतील भीमसेना प्रतिष्ठानतर्फे पवईतील गरजू व अंपग व्यक्तींना पितृ दिनाच्या निमित्ताने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. संस्थेच्या तरुणांनी आपल्या या कार्यातून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

प्रतिष्ठानतर्फे अन्नधान्य किट वाटपाच्या कार्यक्रमासोबत कोरोना काळात निस्वार्थ काम करणाऱ्या पवईतील समाजसेवक शिवसेना शाखा १२२ शाखाप्रमुख सचिन मदने, बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष विशाल खंडागळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी तालुका अध्यक्ष प्रमोद पांचाळ, समाजसेवक सुरेश ढवळे आदींचा यावेळी शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी भिमसेना प्रतिष्ठानचे संस्थापक राहुल गच्‍चे, अध्यक्ष रवींद्र बारसिंग, कार्यअध्यक्ष प्रदीप अंभोरे, खजिनदार अक्षय कांबळे, सल्लागार संदीप दाभाडे आणि युवा तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

जयभीमनगर बुद्ध विहार येथे सरकारने दिलेल्या नियमांचे पुरेपूर पालन करून हा सर्व नियोजित कार्यक्रम पार पडला. यावेळी भदंत शिलबोधी यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले. “आम्ही यापुढे देखील अशाप्रकारे गरजवंताना नियमितपणे वेळोवेळी मदत करत राहू,” असे यावेळी बोलताना संघटनेतर्फे सांगण्यात आले.

, ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!