पवईत मोटारसायकल चोरांचा सूळसुळाट; गलेरिया, फुलेनगरमधून दुचाकींची चोरी

@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण

फुलेनगर येथून चोरीला गेलेली विकास खाडे यांची मोटारसायकल

वईमध्ये गेल्या महिनाभरात मोटारसायकल चोरांचा वावर वाढला असून, महिनाभरात दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काल रात्री महात्मा फुलेनगर येथून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पवई परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

फुलेनगर येथे राहणारे विकास खांडे यांनी काल नेहमीप्रमाणे आपली बजाज डिस्कव्हर मोटारसायकल क्रमांक एमएच ०१ ए. झेड. २४८५ (MH 01 AZ 2485) आपल्या घराजवळ असणाऱ्या पार्किंगमध्ये लावली होती. सकाळी कामावर जाण्यासाठी म्हणून बाहेर येवून पाहिले असता त्याची गाडी पार्किंगमधून गायब होती.

अनेक ठिकाणी शोधाशोध करूनही काहीच पत्ता लागला नसल्यामुळे, विकास याने पार्कसाईट पोलीस ठाण्यात जावून अज्ञात व्यक्तीने गाडी चोरी केल्याची माहिती दिली आहे.

“मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलो असता पोलिसांनी सगळी माहिती नोंद करून घेतली आहे. मला अजूनही आसपासच्या परिसरात कुठे गाडी मिळून किंवा आढळून येते का पाहायला सांगितले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून लवकरच गाडी मिळवून देऊ असे आश्वासन सुद्धा त्यांनी मला यावेळी दिले, असे आवर्तन पवईशी बोलताना विकास याने सांगितले.

दुसऱ्या एका घटनेत जानेवारी १८ तारखेला आयआयटी पवई येथे राहणारा प्रथमेश पाटील याची ६ महिन्यापूर्वी खरेदी केलेली बुलेट मोटारसायकल चोरट्यांनी हिरानंदानी, गलेरिया येथून पळवली.

१८ तारखेला हिरानंदानी, गलेरिया येथे आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचल्यानंतर, प्रथमेशने आपली बुलेट मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ सि.आर. ७९७५ (MH 03 CR 7975) तळमजल्यावर असणाऱ्या पार्किंगमध्ये पार्क करून ठेवली होती. संध्याकाळी ९.१५ वाजता ड्युटी संपवून तो खाली परतला तेव्हा त्याने पाहिले कि पार्किंगमधून गाडी गायब होती. आसपासच्या परिसरात शोधाशोध करूनही गाडी कुठेच मिळून आली नसल्याने त्याने पवई पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

गलेरिया येथून चोरीला गेलेली प्रथमेश पाटील याची बुलेट मोटारसायकल

“माझी गाडी चोरीची घटना घडण्याच्या २-३ आठवड्यापूर्वी मी स्वतः एका माणसाला गाडीचे पेट्रोल चोरताना पकडले होते. याची माहिती त्याचवेळी मी गलेरिया प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना दिली होती.” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना प्रथमेश याने सांगितले.

विभागात महिन्याभरात दोन दुचाकी चोरीच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहत लवकरात लवकर चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!