पवई तलावाची स्वच्छता जागतिकस्तरावर; भारतातील पहिलाच प्रयोग

जलपर्णी आणि शेवाळच्या विळख्यात अडकलेला पवई तलाव

परदेशातील नद्या, तलावे इतके स्वच्छ असतात की त्यांच्या सौंदर्याची कुणालाही भुरळ पडते. भारतातील नद्या आणि तलाव गटारगंगा झाल्या आहेत. जे पाहता मुंबई महानगर पालिकेने प्रदूषित मिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच दासून इंटरनॅशनल या कॅनेडियन कंपनीसोबत एक करार करण्यात येणार आहे.

पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिका कॅनडातील डीसीएल १७ हे तंत्रज्ञान वापरणार आहे. दासून इंटरनॅशनल आणि इकोनिक एकता वेंचर्स प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या शिष्टमंडळाने पालिका अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्या दालनात या अत्याधुनिक स्वच्छता उपक्रमाचे सादरीकरण केले. या नव्या तंत्रज्ञानानुसार स्वच्छता करताना जैवविविधतेला बाधा येत नाही. तर यात नव्याने निर्मितीही करता येते. या तंत्रज्ञानात पाण्यातील हानीकारक रोगजन्य जिवाणूंचा नाश करता येतो.

कॅनेडियन शिष्टमंडळाचे डेव्ह, स्टीफेन स्टार, हिमांशू पटेल, संजय पांडे आणि नगरसेवक अभिजित सामंत यावेळी उपस्थित होते.

परदेशात नद्या, तलाव हे त्या शहरांचे वैभव असतात, मात्र मुंबईतील नद्या आणि तलावांची स्थिती सध्या फारशी चांगली नाही. पवई तलावाची सध्याची स्थिती फार दयनीय असून, संपूर्ण तलाव शेवाळ आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकला आहे. या धोक्याच्या घंटेला घेवून पवईकर नागरिक, पवई इन्फो, आवर्तन पवई आणि पवई तलाव बचावासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून “सेव्ह पवई लेक” (पवई तलाव वाचवा) अंतर्गत तलावाच्या बचावासाठी काम करत आहे.

आता पवई तलावाची ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. डीसीएल १७ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने १७ पद्धतीने तलाव, नद्यांची स्वच्छता करता येते. या टेक्नॉलॉजीनुसार पाच ग्रॅममध्ये दहा लिटर पाणी शुद्धीकरण करता येते. आतापर्यंत ढाका येथील तलाव, बँकॉक, थायलंड, ग्रेटर टोरंटो, कॅनडा, मिसिसिपी नदी आदी ठिकाणी प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र भारतात प्रथमच हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes