पवई तलाव दुर्घटना अपघात कि घात?, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वई तलावात झालेल्या अपघातानंतर अखेर तीन दिवसांनी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे राजकीय गोटातील मोठे संबंध, भोईर याच्याकडे सापडलेली परवानाधारक बंदूक आणि त्याच्या जीवाला असणारा धोका, यामुळे या घटनेच्या तपासाला अजून एक नवी दिशा मिळली असून, ही दुर्घटना अपघात कि घातपात यादृष्टीने सुद्धा पोलिस तपास करत आहेत.

पवई तलाव भागात रात्रीच्या वेळी चालणाऱ्या पार्ट्यांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही पवई तलावात पार्टीसाठी जाताना बोट उलटून झालेल्या अपघातात तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण? असा सवाल समाजाच्या विविध स्तरातून उठत आहे. पर्यावरणवादी संस्थांकडून सुद्धा यास जबाबदार लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करा अशी मागणी जोर धरत असल्याने, अखेर मंगळवारी पवई पोलिसांनी भादवि कलम ३०४ नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

अपघात कि घातपात

पवई तलावात बोट उलटून झालेली दुर्घटना ही प्रथम दर्शनी अपघात जरी वाटत असली तरी, या दुर्घटनेनंतर दिनेश यशवंत भोईर (३४) यांचा मृतदेह तलावाबाहेर काढल्यावर त्याच्याकडे परवानाधारक पिस्तुल आढळून आली होती. त्याच्या जीवाला धोका असल्यामुळे त्याने ही परवानाधारक पिस्तुल मिळवली होती. त्यामुळे पवई तलावात बोट उलटून झालेली दुर्घटना हा घातपाताचा प्रकार तर नाही ना यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

“दिनेशचा बांधकाम व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने ठाणे पोलिसांकडून त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगत दोन बंदूकांचे परवाने मिळवले होते. ज्यातील एक बंदूक तो कुटुंबाच्या संरक्षणासाठी घरी ठेवत असे, तर एक बंदूक स्वतः जवळ बाळगत असे. मात्र त्याला कोणापासून धोका होता? त्याला कोणाकडून धमकी आली होती का? पार्टीमागील उद्देश, मोठ्या नेत्याशी असलेले मृत्युमूखी पडलेल्या लोकांचे संबंध असे बरेच प्रश्न अस्पष्ट असल्याने घडलेली घटना ही नक्की अपघात कि घातपात याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही तपास करत आहोत” असे आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!