साकीनाका पोलीसांची गुन्हेगारी रोखण्यासाठी भित्तीचित्राद्वारे जनजागृती

चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गुन्ह्याचे प्रकार बघूनच अनेक गुन्हेगार गुन्हे करत असतात. साकीनाका पोलिसांनी यावरच एक युक्ती लढवत चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या “व्हिलन”ची भित्तीचित्रे बनवून त्यांच्या आधारे संदेश देताना अधिक मनोरंजक करण्यासाठी त्यांचे प्रसिद्ध संवाद वापरून परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृतीची शक्कल लढवली आहे.

साकीनाका पोलिस स्टेशनच्या भिंतीवर चित्रपटातील नामांकित व्हीलनस गुन्हेगारी वाईट आहे, कायदा सुव्यवस्था आणि पोलीस हे नेहमीच अग्रस्थानी आहेत असे संदेश देताना आढळून येत आहेत.

“शहाण्या माणसाने आयुष्यात पोलीस ठाण्याची पायरी कधी चढू नये, ती खूप वाईट असते” असा समज एका पिढीतून दुसऱ्या पिढीत चालत आलेला आहे. यामुळे अनेक लोक पोलिसांना तक्रार करायला किंवा सहकार्य करायला पुढे सरसावत नाहीत. जे पाहता लोकांच्या मनातील पोलिसांच्या बद्दलची भीती कमी व्हावी म्हणून सतत काम करणाऱ्या साकीनाका पोलिसांनी पोलीस ठाण्याला येणारा मार्ग भीतीदायक न वाटता, आकर्षित असावा म्हणून असल्फा झोपडपट्टीला इटलीच्या पॉझिटोनोशी तुलना करता येईल अशा पद्धतीने रंगवून पोस्टकार्ड स्वरूप देणाऱ्या रंग दे टिमला हे कार्य सोपवले. ७० लोकांच्या टीमने अवघ्या दिवसभरात हे काम पूर्ण केले आहे.

भित्तीचित्रांमध्ये अमरीश पुरी पकडला गेल्यानंतर “मॉग्यांबो नाखूष हुवा”, दुसरे व्हिलन अजित आपल्या स्टायलमध्ये “सारा शहर लॉ एंड ऑर्डर को मानता है” असे म्हणताना आढळून येतोय. हिंदी चित्रपट श्रुष्टीतील सर्वात मोठा व्हिलन मानला जाणारा गब्बर सुद्धा पोलिसांच्या कर्तबगारीला सलाम करतोय तर चित्रपटांमध्ये सर्वात जास्त पोलिसांची भूमिका बजावणारे अमिताभ बच्चन भित्तीचित्रातून “कानून के हाथ लंबे ही नही, तेज है” असा संदेश देत आहेत. ‘स्टे सेफ’ पेंटिंगच्या सहाय्याने कलाकारांनी पोलिसांचे नेटवर्क आणि याच आधारावर जनतेच्या सुरक्षेची हमी दाखवली आहे.

‘लोक सहसा पोलीस ठाण्यास येण्यास भयभीत होतात. आम्ही लोकांच्या मनातून हे भय काढून टाकू इच्छित होतो. पोलीस ठाण्याच्या रिक्त भिंती भयावह ठरत असल्याने, आम्ही त्यांना रंगात चित्रित करून सुंदर बनवायचे ठरवले. बॉलीवूड थीममुळे लोकांना संदेश देणे सोपे झाले आहे.’ असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!