पवई तलावात बुडालेल्या तरुणास गणेश विसर्जनास बंदी केल्याचा समाजसेवी संस्थेचा दावा

mahesh-fin-pix

महेश गौंड

वई तलावात विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण पवईवर शोककळा पसरलेली असतानाच, गणेश विसर्जनाचे काम पाहणाऱ्या ‘पवई नागरिक सेवा संस्था’ या समाजसेवी संस्थेने महेश यास पोहता येत नसल्याने विसर्जनाच्या कामास मनाई केली होती असा दावा केला आहे. या घटनेने  सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न गणेश विसर्जनाच्या कामकाजावर उपस्थित झाला असून, याची नक्की जबाबदारी कोणाची? असा प्रश्न आता नागरिक विविध माध्यमातून करत आहेत.

“गणपती विसर्जनाच्या कामासाठी महेश आपल्या नातेवाईकांसह आम्हाला येऊन भेटला होता. त्याचे मित्र व नातेवाईक आमच्या या समाजसेवेत काम करत असल्याने आम्ही त्यास या कार्यात सामिल करून घेतले. मात्र, त्याला पोहता येत नसल्याचे माहिती होताच दिड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशीच आम्ही त्याला विसर्जन कार्यास मनाई करून कार्यापासून दूर केले होते. त्यानंतर तो तलाव भागात किंवा विसर्जनाच्या ठिकाणी आढळून आला नाही. रविवारी सात दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी त्यास मिळालेला टी-शर्ट घालून तो त्याच्या मंडळाचा गणपती घेऊन विसर्जनास आला होता. आमच्या कार्यकर्त्यांनी मनाई केल्यानंतरही तो जबरदस्ती तराफ्यावर चढून विसर्जनास गेला असताना पाय घसरून तलावात पडल्याने बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “काही लोकांनी आमच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आणि कार्याबाबत केलेले हेवेदावे हे संपूर्णतः खोटे आहेत. आमच्या नियोजनबद्धरित्या केल्या जाणाऱ्या कार्यामुळेच आणि सुरक्षिततेबाबत घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळेच आम्हाला हे सामाजिक कार्य वर्षानुवर्ष करण्याची संधी दिली जाते.”

या घटनेने संपूर्ण पवई हादरली असून, सोशल मिडियाच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेस नक्की जबाबदार कोण? आणि विसर्जन कार्यात सामिल होणाऱ्या युवकांच्या सुरक्षेचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!