हिरानंदानीत फुटपाथवर येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी लागणार बुलेट बॅरिअर

हिरानंदानी भागात फुटपाथवर चढून येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी ८ ठिकाणी बुलेट बॅरिअर बसवण्यात येणार आहेत. नगरसेवक फंडातून पालिकेतर्फे हे काम केले जाणार आहे. रविवारी या कामाच्या सुरुवातीचा नारळ नगरसेवक (१२२) वैशाली पाटील, स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, अभिनेता मुकेश रिशी आणि हिरानंदानी नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

पवईतील हिरानंदानी भागात मोठे, सुटसुटीत आणि वाहतूक कोंडी रहित रस्त्यांमुळे महाविद्यालयात शिकणारे अनेक तरुण या भागात वाहने चालवण्यासाठी आणि वाहनांची शर्यत लावण्यासाठी येत असतात. शर्यतीत अनेकवेळा अपघात झाल्याचेही समोर आले आहे. बऱ्याच वेळा तरुण रस्ता सोडून नागरिकांना चालण्यासाठी बनवलेल्या फुटपाथवर आपल्या गाड्या चालवतात. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यांवरून चालावे लागते किंवा फुटपाथवरून चालताना वाहनांचे धक्के लागून अपघात घडत असतात.

“हिरानंदानीतील अनेक ज्येष्ट नागरिक आणि महिलांनी आमच्याकडे फुटपाथवर वाहनचालकांच्या तक्रारी केल्यानंतर, आम्ही यावर उपाययोजना म्हणून बुलेट बॅरिअरचा उपाय नागरिकांसमोर ठेवला होता. ज्याला नागरिकांनी पसंती दर्शवल्यानंतर आम्ही आज या कामाची सुरुवात करत आहोत” असे याबाबत बोलताना नगरसेविका वैशाली पाटील यांनी सांगितले.

“हिरानंदानी एक विकसित परिसर आहे त्यामुळे त्यांना खूप छोट्या छोट्या समस्या आहेत. त्यापैकी त्यांना बाईकर्सचा त्रास हा खूप जास्त आहे. बाईकर्स फुटपाथवर येवून भरधाव वेगात गाडी चालवणे, स्टंट करणे असे प्रकार करत असतात. म्हणून आपण हिरानंदानीतील विविध भागात ५५ बुलेट बॅरिअर बसवत आहोत” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी सांगितले.

नगरसेवकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिक आनंदी असून, लवकरच त्यांच्या या समस्येचे निवारण होईल अशी आशा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

One Response to हिरानंदानीत फुटपाथवर येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी लागणार बुलेट बॅरिअर

  1. Prashant Patil March 29, 2018 at 8:14 am #

    Keep it up Vaishu….

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes