विनयभंगाच्या गुन्ह्यात कॅब चालकाला अटक

वईतील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असताना, बँकर असणाऱ्या तरुणीशी अॅप बेस्ड कॅब चालकाने तिचा विनयभंग केल्याची तक्रार केल्यानंतर पवई पोलिसांनी त्या कॅब चालकाला अटक केली आहे. सुरेश कुमार यादव (३६) असे अटक करण्यात आलेल्या कॅब चालकाचे नाव आहे.

एका २५ वर्षीय तरुणीने सोमवारी संध्याकाळी ५ वाजता नरिमन पॉईंट येथून आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी एक अॅप सेवेतील कॅब बुक केली होती. गाडी चालत असताना कॅब चालकाने तिच्याशी अश्लील चाळे केल्यानंतर तिने पवई पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार नोंद केली असल्याचे पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीत सांगितले.

तक्रारदार तरुणीने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, संध्याकाळी ५ वाजता तिने कॅब बुक केली होती. तिची तब्येत बरी नसल्यामुळे चालकाने तिला पुढे चालकाच्या बाजूला असणारी सिट ही आरामदायक असल्यामुळे तिथे बसण्यास सांगितले.

“गप्पा मारत त्याने तिच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आणि तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा सुद्धा. चुकून स्पर्श झाला असावा असे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, पुन्हा पुन्हा त्याने तिच्या शरीराला स्पर्श करायला सुरुवात केल्यानंतर तिने आपल्या एका मित्राला मेसेज करून हिरानंदानी येथे बोलावून घेवून तिथून ते कॅब चालकाला पोलीस ठाण्याला घेवून आले. असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“भादवि कलम ३५४ आणि ३५४ (ए) नुसार गुन्हा नोंद करून आम्ही कॅब चालक सुरेश कुमार यादव याला अटक केली आहे. आज त्याला कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे,” असे याबाबत बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes