पवई अनैसर्गिक अत्याचार घटनेतील आरोपीना पकडण्यात होत असणाऱ्या दिरंगाई विरोधात स्थानिकांचा निषेध मोर्चा

पवई मोरारजी नगर येथे दोन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारा नंतर त्यांनी विष घेऊन आत्महत्या केली होती, या घटनेला महिना उलटूनही आरोपी मोकाट असल्याने स्थानिकांनी आज मोरारजी नगर ते पवई पोलिस ठाणे असा निषेध मोर्चा काढला. आरोपीना त्वरित अटक करून कडक शिक्षा दया. केस सीबीआयकडे सोपवा. आशा मागण्या यावेळी मोर्चेकरूंनी पोलिसांसमोर ठेवल्या.

१२ जुलैला रात्री मोरारजीनगर येथे राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलाला अचानक उलट्या होऊ लागल्याने त्याच्या पालकांनी त्याला दवाखान्यात दाखल केले असता, त्याने उंदीर मारण्याचे विष घेतल्याचे व त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्याने आपल्या सोबत असणाऱ्या १० वर्षीय मित्रासोबत सुद्धा अत्याचार झाल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

पवई पोलिसांनी भादवि कलम ३७७ व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरु केला असतानाच २६ जुलैला  केईएम रुग्णालयात उपचारा दरम्यान १३ वर्षीय मुलाचा सुद्धा मृत्यू झाला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पवई पोलीस, विशेष पथक आणि गुन्हे शाखा असे समांतर तपस सुरू आहेत. मात्र घटनेला एक महिना उलटूनही अजूनही आरोपी मोकाट आल्याने पोलीस प्रशानाच्या विरोधात आज स्थानिकांनी मोर्चाचे आयोजन केले होते.

संध्याकाळी ५.१५ वाजता मोरारजी नगर येथून या मोर्चाची सुरवात झाली. महिला आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाला होता. “वि वॉन्ट जस्टीस” “अपराध्याना कठोर शिक्षा करा” “आरोपींना लवकरात लवकर अटक करा नाहीतर केस सीबीआयला सोपवा आशा मागण्या मोर्चेकरांनी यावेळी लावून धरल्या.

मी नुकताच चार्ज घेतलाय इतर सहकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर आरोपींना बेड्या ठोकतो असे आश्वासन वरिष्ठ पोलिस निरीक्षक फोपळे यांच्याकडून मिळाल्यानंतर पोलिस स्टेशनसमोर शांततेत मेणबत्या जळवून शोकसभेने याची सांगता करण्यात आली.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!