पवईमध्ये उभ्या कारला आग

पवईतील हिरानंदानी भागात उभ्या एका फोर्चूनर कारला आग लागल्याची घटना मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, कारचा बराच भाग जळून खाक झाला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ठाणेतील वाघबीळ परिसरात राहणारे नित्यानंद वाघमारे हे पवई येथील लेक बेलवर्ड रस्त्यावर असणाऱ्या ट्रान्स ओसिअन हाउस इमारतीत आले होते. त्यांनी आपली फोर्चूनर कार क्रमांक एमएच ०३ बिएस ०००४ ही याच मार्गावर पार्क करून ठेवली होती. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गाडीच्या इंजिन भागातून धूर निघत असल्याचे समोर आले आणि काही क्षणातच गाडीच्या पुढच्या भागाने पेट घेतला.

आगीची माहिती मिळताच हिरानंदानी एसटीएफ, स्थानिक कामगार आणि नागरिकांच्या मदतीने इमारतीत असणाऱ्या अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे आवर्तन पवईशी बोलताना प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

“घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता आहे.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!