पवईत चोरट्यांनी फोडले दारूचे दुकान, ८.५ लाखाची दारू आणि रोकड लंपास

पवईत चोरट्यांनी फोडले दारूचे दुकान, ८.५ लाखाची दारू आणि रोकड लंपाससोमवारी राज्य सरकारच्या परवानगीनंतर पवईतील एक दारूचे दुकान उघडले असता दुकानात ८.५ लाखाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. मालकाने दुकान उघडले असता दुकानातील ७.५ लाख किंमतीच्या दारूच्या बाटल्या आणि १.१० लाखाची रोकड चोरट्यांनी पळवल्याचे लक्षात आले. पवई पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर मार्चपासून राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. यात दारूच्या दुकानांचाही समावेश होता. मात्र राज्य सरकार आणि उत्पादन शुल्क विभागाने काही अटी-शर्थी घालत दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर सोमवारी पवईतील तुंगागाव येथे असणाऱ्या एका दुकानदाराने आपले दारूचे दुकान उघडले. दुकान उघडताच समोरील परिस्थिती पाहता त्याला धक्काच बसला. दुकानातील मद्याच्या बॉटल्स आणि गल्ल्यातील रोकड चोरी झाली होती.

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर दुकानात असणाऱ्या लोखंडी कपाटात आम्ही सर्व दारूच्या बाटल्या ठेवल्या. सोमवारी दुकान उघडले तेव्हा माहिती पडले की येथील ७.५ लाख किंमतीच्या दारूच्या बाटल्या आणि गल्ल्यात ठेवलेले १.१० लाखाची रोकड चोरीस गेली आहे., असे पोलिसांना दिलेल्या जवाबात दुकानाचे मालक प्रमोद डोडेजा यांनी म्हटले आहे.

“दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आहे. नंतर त्यांनी जाताना ते व्यवस्थित करून ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. दुकान बंद असल्यामुळे दुकानातील लाईट आणि सीसीटीव्ही दोन्ही बंद ठेवण्यात आले होते. २१ मार्च ते ४ मे दरम्यान ही घटना कधी घडली आहे. नक्की कधी घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.” असे याबाबतची पुष्टी करताना पोलिसांनी सांगितले.

पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून, आसपासच्या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज मागवले आहे. फुटेजच्या आधारावर ते चोरट्यांचा शोध घेत आहेत.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!