Archive | अपराध, गुन्हे, घटना

main1

पवईत उच्चभ्रू इमारतीत चोराने मारला मोठा डल्ला

पवईतील लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने घरफोडी करत मोठा डल्ला मारल्याची घटना सोमवार, २० जुलै रोजी घडली आहे. इमारतीच्या ५व्या मजल्यावर असणाऱ्या ५०२ फ्लॅटमधून चोरट्याने ९ लाख २५ हजाराचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणि रोकडीवर हात साफ केला आहे. चोरीला गेलेल्या मालमत्तेची नोंद घेणे सुरु असून, हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष […]

Continue Reading 0
bike-theft

मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक

साकीनाका येथून चोरीला गेलेली काळ्या रंगाची पल्सर २२० मोटारसायकल सह ४ मोटारसायकल पोलिसांनी केल्या हस्तगत सुरक्षित पार्क करून ठेवलेल्या मोटारसायकल वर पाळत ठेवून संधी साधत बनावट चावीने तिची चोरी करून अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखा कक्ष ११ने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्यातील एक साकीनाका पोलीस ठाणे हद्दीतील […]

Continue Reading 0

ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोघांना १ कोटीच्या ड्रग्ससह साकीनाका येथून अटक

आरोपींच्या चौकशीत पोलिसांना दोघेही महाराष्ट्रात अंमली पदार्थाच्या तस्करी करणार्‍या टोळीचा भाग असल्याचे समोर आले आहे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) जुहू युनिटने बुधवारी साकीनाका येथे मेफेड्रॉन नामक अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार १.१० कोटी रुपये किमतीचे २.७५ किलोग्रॅमचे मेफेड्रॉन जप्त केले आहे. साकीनाका येथील ९० फिट रोडवर […]

Continue Reading 0
accident

आयआयटी पवई येथे मोटारसायकल चालकाला उडवले; डॉक्टरला अटक

रविवारी सकाळी आयआयटी-पवई सिग्नलजवळ एका मोटारसायकल चालकाला धडक देत हयगयने गाडी चालवत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका २४ वर्षीय डॉक्टरला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ सत्येंद्र चौधरी असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील रहिवासी असणारे सचिन पुतळाजी भोसले (२९) हे या अपघातात मृत पावले आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी […]

Continue Reading 0
bharat harale and team

राजगृहावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा, पवई पोलिसांना अनुयायांचे निवेदन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान राजगृहावर मंगळवारी दोन अज्ञात इसमांनी हल्ला करत तोडफोड केली. यानंतर त्यांच्या अनुयायांकडून मोठा राग व्यक्त केला जात आहे. मात्र आंबेडकर परिवाराने अनुयायांना शांत राहण्याची विनंती केल्यानंतर पवई परिसरातील अनुयायांतर्फे आरोपींना त्वरित अटक करून, आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि राजगृह तसेच आंबेडकर परिवाराला सक्षम सुरक्षा प्रदान करण्याची […]

Continue Reading 0
FIRE IN HIRANANDANI DELPHI

हिरानंदानीतील डेल्फी इमारतीत ५व्या मजल्यावर भीषण आग

पवईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या हिरानंदानी गार्डन्स येथील डेल्फी इमारतीच्या ५व्या मजल्यावर आग लागल्याची घटना आज, बुधवार १ जुलै रोजी सकाळी घडली. एसीच्या डक्टमध्ये शोर्ट-सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. पवईतील हिरानंदानी परिसरातील डेल्फी इमारतीमध्ये ५व्या मजल्यावरून आगीचे लोळ आणि धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनात आले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही […]

Continue Reading 0
Two Yemeni nationals have been arrested here for allegedly cheating

फसवणूकीच्या गुन्ह्यात २ येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी पुण्यातून केली अटक

मुंबईत उपचार घेत असलेल्या येमेन देशातील सहा सैनिकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पुणे येथे लपून बसलेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या आहे. फहद रदवान अल मस्तारी (३३) आणि अली अब्दुलघानी अली अल गौझी (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. येमेनमधील सुरू असलेल्या गृहयुद्धात जखमी झालेले […]

Continue Reading 0
IMG_3119

पवईत व्यावसायिकाची कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या

पवईतील जलवायू विहारच्या पाठीमागील जैन मंदिर रोडवर शुक्रवार २६, जूनला सकाळी एका कारमध्ये ४१ वर्षीय व्यवसायिकाचा मृतदेह पवई पोलिसांना मिळून आला आहे. नैराश्यातून त्याने कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अधिक तपास सुरु आहे. या संदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुख्य नियंत्रण कक्षाकडून एसएम शेट्टी शाळेजवळील म्हाडा इमारत क्रमांक […]

Continue Reading 0
nsg cmnd house theft

पवईत चोरट्यांनी फोडले दारूचे दुकान, ८.५ लाखाची दारू आणि रोकड लंपास

सोमवारी राज्य सरकारच्या परवानगीनंतर पवईतील एक दारूचे दुकान उघडले असता दुकानात ८.५ लाखाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. मालकाने दुकान उघडले असता दुकानातील ७.५ लाख किंमतीच्या दारूच्या बाटल्या आणि १.१० लाखाची रोकड चोरट्यांनी पळवल्याचे लक्षात आले. पवई पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!