Archive | अपराध, गुन्हे, घटना

kidney racket

पवईत किडनी रॅकेटचा पर्दाफाश, चार जणांना अटक

लोकांना फसवून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे संमती मिळवून किडनी रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी समाजसेवकांच्या मदतीने गुरुवारी पर्दाफाश केला आहे. भादवि कलम १२० (ब), ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा नोंद करत मुख्य सूत्रधारासह चार लोकांना या गुन्ह्यात अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये रुग्णाच्या मुलाचा सुद्धा समावेश आहे. मुख्य सुत्रधार भैजेंद्र भिसेन (४२), […]

Continue Reading 0

झोपडपट्टी माफियांना पवईत अटक

बेकायदा घरे विकून लोकांना करोडोचा गंडा घालणाऱ्या तीन झोपडपट्टी माफियांना पवई पोलिसांनी केली अटक वन विभागाच्या जागेवर घरे बांधून, ती आपले असल्याचे भासवून, लोकांना विकून करोडोचा गंडा घालणाऱ्या एका महिलेसह तिच्या दोन साथिदारांना पवई पोलिसांनी वन विभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने अटक केली आहे. रेश्मा खान (४५), नैबुल हुसेन (४४) व मोहमद हुसेन खान (३७) अशी अटक […]

Continue Reading 0
j day name hiranandani powai

हिरानंदानीतील चौकाला पत्रकार ज्योतिर्मय डे यांचे नाव

गुन्हे व शोध पत्रकार ज्योतिर्मय डे (जेडे) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या हिरानंदानी येथील चौकाला, सन्मानार्थ त्यांचे नाव देण्यात येणार आहे. १३ जुलै रोजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत नामकरण फलकाचे उदघाटन केले जाणार आहे. मुंबई प्रेस क्लब, स्थानिक रहिवाशी, हिरानंदानी विकासक व महानगरपालिका यांच्या माध्यमातून या चौकाला जेडे यांचे नाव देण्यात येणार आहे. […]

Continue Reading 0
hatya

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

लग्नाच्या सात वर्षानंतरही मूल होत नसल्याने मानसिक तणावात असलेल्या व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात हातोडी घालून तिची हत्या करून, स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. याबाबत पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास करत आहेत. पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या फिल्टरपाडा भागात राहणाऱ्या सुरेश बीजे आणि प्रिती बीजे यांचे सात वर्षापूर्वी लग्न […]

Continue Reading 0
dump

खदानीत सापडला तरुणाचा मृतदेह

रविराज शिंदे मंगळवार पासून गायब असणाऱ्या पवईतील एका वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह हनुमान नगर येथील खदानीत शुक्रवारी पहाटे सापडला असून, त्याची हत्या कि आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. सोनू पांडियन (२०) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पवईतील महात्मा फुले नगरमधील रहिवाशी आहे. पवईतील महात्मा फुले नगरमध्ये आपल्या ३ भावंडासह राहणारा सोनू कचरा वेचण्याच […]

Continue Reading 0
stalker-shadow

महिलांना गोड बोलून लुटणाऱ्या इसमाचा पवईत धुमाकूळ

पवई पोलिसांचा महिलांना सतर्कतेचा इशारा, मुंबई पोलीस हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन चांदिवली, हिरानंदानी येथील महिलांशी प्रेमळ, गोड बोलून लुटणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या इसमाने गेल्या अनेक दिवसांपासून पवईत धुमाकूळ घातल्याने महिलांमध्ये एकच खळबळ माजली आहे. एकट्या महिलेला गाठून तिच्याशी प्रेमळ, गोड बोलून, कोरिओग्राफर असल्याचे सांगून हा इसम त्यांच्याकडून पैसे व वैयक्तिक माहिती मिळवीत आहे. पैसे नाकारल्यास […]

Continue Reading 0
IMG_8454ab

अन् उभी इंडिगो पेटली

चांदिवली भागात चालत्या रिक्षाला आग लागून रिक्षा जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच, आयआयटी येथील तिरंदाज शाळेसमोर कारच्या एसीत शॉर्ट झाल्याने पार्किंगमध्ये उभी टाटा इंडिगो पेटल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. मात्र इंडिगो गाडी पूर्ण जळून खाक झाली असून, तिच्या जवळ पार्क असणाऱ्या कॉलीस आणि मारुती […]

Continue Reading 0
IMG-20160601-WA0002

नैराश्यातून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

प्रमोद चव्हाण @pracha2005 उच्चशिक्षित असूनही चांगली नोकरी मिळत नाही आणि त्यामुळे लग्न ठरत नाही, या नैराश्यातून आयआयटी येथील पॅराडायज इमारतीत राहणाऱ्या जसकमल सेहगल (३०) या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल पवईत घडली. पवई पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंद केला असून ते अधिक तपास करत आहेत. लंडन येथून एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर जसकमल आपल्या आईवडिलांसोबत […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

लेकहोममध्ये घरफोडी, २.५ लाखाचा ऐवज साफ

मंगळवारी चांदिवली येथील लेकहोम, एव्हरेस्ट हाईट इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १२०७/१ मध्ये, डक्टच्या साहय्याने बाथरूममध्ये घुसून, घरातील ६ लाख रुपये किंमतीच्या ऐवजावर अज्ञात चोरट्याने हात साफ केला आहे. पवई पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद करत सोसायटीत असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या  आधारे तपास सुरु केला आहे. लेकहोम, एव्हरेस्ट हाईट इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील १२०७/१ मध्ये सहकुटुंब राहणारे विश्वनाथ […]

Continue Reading 0

३८ लाखांच्या ‘एमडी’ अंमली पदार्थासह पवईतील एकाला अटक

अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या तीन इसमांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने टागोरनगर, विक्रोळी येथून ३८ लाखांच्या ‘एमडी’ या अंमली पदार्थासह अटक केली आहे. अटक तीन आरोपींमधील एक इसम हा पवई भागातील रहिवाशी असून, यात एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. हा साठा त्यांनी कुठून आणला व कोणास विकणार होते? याचा पोलिस आता शोध घेत आहेत. विक्रोळी येथील […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes