Archive | अपराध, गुन्हे, घटना

पवईत खंडणीच्या गुन्ह्यात महिला पोलीस अधिकारी व दोन शिपायांना अटक

चांदिवली येथील ओसिएन स्पा आणि सलूनमध्ये देह्व्यवसाय चालतो असा खोटा आरोप लावून, धमकी देवून कारवाई टाळण्यासाठी स्पाच्या मालकिणीकडून २ लाख रुपयाची मागणी करून, १० हजार रुपयाची खंडणी उकळणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस निरीक्षकासह २ पोलीस शिपाई, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा (खबरी) व पोलीस असल्याचा दावा करणारी महिला (खबरी) अशा ५ जणांना पवई पोलिसांनी अटक […]

Continue Reading 0
बंदूक

बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाची लूट

बीएमडब्ल्यू गाडीतून येऊन चौघांनी पवईतील एका व्यावसायिकाला लुटल्याची हादरवून टाकणारी घटना पवईजवळ घडली आहे. व्यावसायिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन व २ मोबाईल फोन अशी एक लाखाची लूट या चोरट्यांनी केली आहे. याबाबत ४ अज्ञात इसमां विरोधात पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पवई येथील व्यावसायिक निलेश डोंगरे (३८) यांनी पार्कसाईट […]

Continue Reading 0
thag pps

गाडी नंबर २५८८

सुट्टे पैसे घेण्याच्या बहाण्याने व विविध मार्गाने लोकांना फसवून मुंबईभर हैदोस घालणाऱ्या ठगास, केवळ ४ अंकी गाडी नंबर वरून पकडण्यात पवई पोलिसांना यश मिळाले आहे. ब्लॅकने गॅस घेण्याच्या बहाण्याने गॅस डिलिवरी करणाऱ्या दोन कामगारांना किंमतीपेक्षा जास्त रक्कम देवून, काही वेळाने त्यांच्याकडूनच सुट्टे पैसे घेण्याच्या बहाण्याने त्यांना ठगणाऱ्या एका  ठगास पकडण्यात पवई पोलिसांच्या तपासी अधिकारी समीर […]

Continue Reading 0
घटनास्थळ

पवई येथील चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक

तुंगागाव येथील चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी रवी सोलंकी (२१) व इरफान (२१) अशा दोघांना आज (शनिवारी)अटक केली असून, अंधेरी कोर्टात दोघांना सादर करण्यात आले असता त्यांना अधिक तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. आजी-आजोबा आणि आत्यासोबत पवईतील साकिविहार रोडवरील तुंगागाव मुरली चाळीत […]

Continue Reading 3
घटनास्थळ

तुंगा परिसरातून हरवलेल्या लहान मुलीचा सापडला मृतदेह

तुं गा परिसरातून गायब झालेल्या श्रीया अजय मेश्राम, हिचा मृतदेह आज (बुधवारी) दुपारी १ वाजता तुंगा परिसरातील कृष्णा बिजनेस पार्क भागातील झाडीत, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या टाकीत आढळून आला आहे. रविवार रात्री ११ पासून तुंगागाव, साकीविहार रोड परिसरातून श्रीया गायब होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्यात आला असून, पोलिसांनी अपहरण, बलात्कार, हत्या व पोस्का […]

Continue Reading 0
accident

आयआयटीत कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

सकाळी रस्त्याने चालत जाणाऱ्या एका मासे विक्रेत्यास आयआयटी, चैतन्यनगर सर्कलवर कारने धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत पवई पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात गाडी चालक श्रीमती खंडेलवाल याना अटक केली असून, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी फुलेनगर येथे राहणारे धिराव प्रसाद (६५) हे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. […]

Continue Reading 0
laptop chor

पवईत कारमधून लॅपटॉप, आयपॅड चोरी

पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप आणि आयपॅड चोरीस गेल्याची घटना काल पवईमध्ये घडली आहे. याबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे पार्किंगमध्ये गाड्या लावणाऱ्या मालक व चालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार हेमंतकुमार तरवरे हे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता पवईत कामानिमित्त आले होते. कामाच्या […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

बांधकाम साईटवर सुरक्षारक्षकाचा २० फुट खड्यात पडून दुर्दैवी मृत्यू

गणेशनगर, पंचकुटीर भागात चालू असणाऱ्या बांधकाम साईटवर ५५ वर्षीय सुरक्षारक्षकाचा २० फुट खोल खड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विश्वनाथ वामन शेंडगे (५५) असे मृत्यू पावलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेवून, पवई पोलिसांनी अग्निशमन दलाच्या साहय्याने जखमीला बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. […]

Continue Reading 0
crime1

शाळेत विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन, विद्यार्थ्याचे १५ दिवसासाठी निलंबन

पवईमधील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने अश्लील वर्तन केल्याची घटना घडली आहे. याबाबत कठोर पाऊले उचलत शाळेने संबंधित विद्यार्थ्याचे १५ दिवसांसाठी शाळेतून निलंबन केले आहे. शाळा आणि घरातील वातावरणात मुलांवर अनेक सुसंस्कार घडत असतात, मात्र सहज उपलब्ध असणारी अनेक माध्यमे व आई-वडील दोघीही नोकरी करत असणाऱ्या परिवारात अनेकदा मुले […]

Continue Reading 0
asd

उंदीर स्टाईल ज्वेलरी शॉपची लूट

अनोळखी चोराने उंदराप्रमाणे भुयारी मार्ग खोदून, मध्यरात्री ज्वेलरी शॉपमध्ये घुसून, दुकानातील १.७ लाखाची चांदिचे दागिने लुटून घेवून गेल्याची अनोखी घटना साकिनाका पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. दुकानाच्या जवळून जाणाऱ्या ड्रेनेज लाईन सोयीचा आधार घेत, चोरट्याने भुयारीमार्ग बनवून दुकानात प्रवेश करत ही चोरी केली आहे. याबाबत साकिनाका पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes