Archive | कोरोना / कोविड १९

Inauguration of Pact Telemedicine and Oxygen Center

पवईत सुरु झाले पॅक्ट टेलिमेडिसीन आणि ऑक्सिजन केंद्र

गौरव शर्मा: ‘आशा मुंबई’ या आशा फॉर एज्युकेशन या वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय चळवळीच्या मुंबई शाखेने सहयोग या पवईतील सामाजिक संघटनेसोबत एकत्र येऊन ‘पॅक्ट’ हे टेलिमेडिसीन व ऑक्सिजन केंद्र पवई येथे सुरू केले आहे. गेली १५ वर्षे आशा मुंबई आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पवईतील चाळसदृश्य वस्त्यांमध्ये शालेय शिक्षण आणि इतर सामाजिक प्रश्नांवर काम करीत […]

Continue Reading 0
corona update 03072020

पवईत दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद

कोरोना बाधितांच्या संख्येने मुंबई महानगरपालिका एस विभागात उच्चांक गाठला असतानाच पवईकरांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी आहे. पालिका एस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई परिसरात ३० जून आणि १ जुलै या दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात ३० जून रोजी एक तर १ जुलै रोजी ३ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूमुळे बाधित होणाऱ्या […]

Continue Reading 0
viththal rakhumai

एस विभागात कोरोना जनजागृतीसाठी साक्षात विठू – रखुमाईंची नागरिकांना साद

अवि हजारे: एस विभागात नागरिकांना कोरोना चे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी पालिकेने केलेल्या अनेक प्रयत्नानंतर सुद्धा नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी साक्षात विठ्ठल- रखुमाई नागरिकांच्या दारोदारी जावून जनजागृती करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनेकमार्गे मार्गदर्शन आणि रोखून देखील लोक घराबाहेर पडत आहेत. कोरोना चा एस विभागात वाढता आकडा लक्षात घेता, लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी […]

Continue Reading 0
vilas mohkar

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एस विभाग प्रयत्नशील

नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला – डॉ. विलास मोहकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( एस विभाग) अवि हजारे: एस विभाग हद्दीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एस विभाग कोरोना बाधितांच्या यादीत ५व्या क्रमांकावर पोहचला आहे. ही वाढती लोकसंख्या विचारात घेता राजकारणी आणि नागरिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, एस विभागाने आपण पूर्णपणे ग्राउंड लेव्हलवर […]

Continue Reading 0
go corona

पवईत कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला

पालिका एस विभागांतर्गत येणाऱ्या पवई परिसरात कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला असून, सोमवार २२ जून रोजी पवईमध्ये ३ बाधितांची नोंद झाली आहे. पवई परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंत मिळालेल्या बाधितांचा आकडा पाहता पवई परिसरात बाधित मिळण्याचा वेग मंदावला असल्याचे समोर येत आहे. कोरोना विषाणूंनी मुंबईवर आपली पकड घट्ट केली असून, पालिका ‘एस’ विभाग कोविड-१९च्या यादीत […]

Continue Reading 1
Coronavirus Photo Credit सांकेतिक चित्र

पालिका ‘एस’ विभाग कोविड -१९च्या यादीत पहिल्या दहात

भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि पवईचा काही भाग यांचा समावेश असलेला पालिका ‘एस’ विभाग अल्प कालावधीतच कोविड -१९ यादीत खालच्या स्थानावरून अव्वल दहामध्ये पोहचला आहे. पूर्व उपनगरातील या विभागात एकट्या गेल्या आठवड्यातच ६०० हून अधिक रुग्ण आढळले असून, मुंबईत हे आठव्या क्रमांकावर आहे. बहुतेक बाधित हे भांडूप, विक्रोळी येथील झोपडपट्टी सदृश्य भागातील असून, अपमार्केट असणाऱ्या पवईचा […]

Continue Reading 0
tunga pratibandhit

तुंगागाव, मुरंजनवाडी कंटेन्मेंट झोन; संचारास निर्बंध

साकीविहार रोडवरील तुंगागाव आणि मुरंजनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित मिळत असल्याने वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिकेने हा परिसर कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमवार ८ जून २०२० पासून ते २१ जून २०२० पर्यंत  हा आदेश लागू करण्यात आला आहे. या काळात व्यवहार आणि संचारास निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना विषाणूमुळे […]

Continue Reading 0
sangharsh nagar main con zone

संघर्षनगर, चांदिवली कंटेन्मेंट झोन; व्यवहार आणि संचारास निर्बंध

चांदिवली संघर्षनगर येथील वाढत्या बाधितांच्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिकेने आता मोठे पाऊल उचलले असून, संघर्षनगर, चांदिवली हा विभाग कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमवार ८ जून २०२० पासून ते २१ जून २०२० पर्यंत  हा आदेश लागू करण्यात आला आहे. या काळात व्यवहार आणि संचारास निर्बंध घालण्यात आले आहेत. देशासह महाराष्ट्रात आणि मुंबईत […]

Continue Reading 2
Chaitanya Nagar 01062020

पवईत ६ दिवसात २७ लोकांना कोरोनाचा संसर्ग

पवईत कोरोना बाधित मिळण्याचा वेग आता हळूहळू मंदावू लागला आहे. २९ मे ते ३ जून २०२० या पाठीमागील ६ दिवसात २७ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. शुक्रवार २९ मे रोजी ४ जणांना, शनिवार ३० मे रोजी ६ जणांना, रविवार ३१ मे रोजी ५ जणांना, सोमवार १ जून ३ जणांना, मंगळवार २ जून […]

Continue Reading 1
baby with mother discharged

पवईतील तीन गरोदर मातांनी कोरोनामुक्त होत दिला गुटगुटीत बाळांना जन्म

गरोदर मातांना कोरोना झाला तर संपूर्ण कुटुंबावर मानसिक तणाव येत असतो. मात्र, पवईतील तीन मातांनी कोरोना व्हायरसवर मात करत कोरोनामुक्त गुटगुटीत बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही  माता घरी परतल्या असून, सामान्य जीवन जगत आहेत. कोरोना विषाणूंचा कहर सर्वत्र पसरत असताना गरोदर महिलांना सुद्धा त्यांनी आपल्या कवेत घेतले आहे. कोरोना संसर्ग असल्याने आजारावर […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!