Archive | पवईचा अवलिया

sunil sawant

पवईतील सावंत कुटूंबाची सामाजिक बांधिलकी, नेत्रदानातून कुटूंब प्रमुखाला मृत्यूनंतरही ठेवले जिवंत

@ रविराज शिंदे पवईतील महात्मा फूलेनगरमध्ये राहणारे सुनिल मनोहर सावंत (४५) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. परिवारावर कुटुंबप्रमुख हरवल्याने दुखाचा डोंगर कोसळला असतानाही धीर धरत सावंत कुंटुंबियांनी सुनिल यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. सुनिल सावंत पवईतील फूलेनगरमध्ये आपल्या पत्नी, दोन मुलं-मुलींसोबत राहत. रोजंदारीवर पेंटिंगचं काम करणाऱ्या सुनिल यांना मागील आठवड्यात आजाराने कवेत घेतले. त्यांच्यावर सायन […]

Continue Reading 0
intro

दहावी परीक्षेत पवईच्या विद्यार्थ्यांची भरारी

@प्रमोद चव्हाण पवईतील अनेक विद्यार्थी शैक्षणिक करिअरच्या स्तरावर पदार्पण करत आहेत. मार्चमध्ये झालेल्या एसएससी (दहावी) परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात बऱ्याच विद्यार्थ्यांनी ९७% पेक्षा अधिक गुण मिळवून त्यांचे कुटुंब आणि शाळा दोघांना गौरव मिळवून दिला आहे. आम्ही पवईंच्या शाळांमधील समृद्ध मिश्रणाचा थोडक्यात घेतलेला आढावा. एस एम शेट्टी हायस्कूल व कनिष्ठ […]

Continue Reading 0
sakinaka police

साकीनाका पोलिसांनी मिळवून दिला बेघर आजीला निवारा

साकीनाका पोलिसांनी एका ६५ वर्षीय एकाकी बेघर वृद्ध महिलेला निवारा मिळवून देत पोलिसांमधील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडविले. छत्र हरवल्याने पोलिसांकडे मदतीसाठी धावलेल्या आजीला साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश भालेराव यांनी मदत करतानाच, २२ हजारांची मदत उभी करून २४ तासांच्या आत आजींच्या निवाऱ्याची व्यवस्था केली. १६ मे रोजी लता शिवराजसिंह परदेशी या वृद्ध महिला […]

Continue Reading 1

पवईकर तरुणाची इस्रो झेप

पवईच्या फिल्टरपाडा परिसरात राहणाऱ्या प्रथमेश सोमा हिरवे या २५ वर्षीय तरुणाची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. पालिकेच्या शाळेत शिक्षक असलेले वडील सोमा आणि आई इंदू यांच्या समवेत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या प्रथमेशने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर गरुड झेप घेत मुंबईतून पहिल्या तरुणाच्या निवडीचा मान पवईला मिळवून दिला आहे. […]

Continue Reading 0

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकचा बुरखा फाटला

पाकिस्तानने कथित ‘रॉ’चे एजंट म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव हे एक व्यावसायिक असून, भारताला खबर न देता नागरिकाला अटक करणे, त्याला फाशीची शिक्षा देणे हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे. जाधव यांच्याकडून जबरदस्ती आरोप कबुली केली असल्याचा आरोप करत भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपला दमदार पक्ष ठेवत पाकिस्तानचे सगळे पितळ उघडे पाडले आहे. गेल्या महिन्यात मिलिटरी कोर्टाचा […]

Continue Reading 0
nisha

तिनचाकीचे सारथ्य ‘ती’च्या हाती, संसाराचा गाडा हाकण्यासाठी

पवई, चांदिवली भागात तुम्ही रिक्षाला हात दाखवता, रिक्षा जवळ येवून थांबते आणि पाहता तर काय एक महिला रिक्षाचालक तिचे सारथ्य करत आहे. हो हे पवईच्या रस्त्यांवर शक्य आहे! कारण गेली अनेक वर्ष केवळ पुरुषांची मक्तेगिरी आहे असे समजले जाणाऱ्या रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात महिलाही उतरल्या आहेत. पार्कसाईट येथे राहणाऱ्या निशा अमोल दांगट (निशा शिवाजी शिंदे) गेली […]

Continue Reading 0
c

यंग इन्वायरमेंटने केला सन्मान ‘ती’च्या कर्तुत्वाचा

स्त्रियांच्या प्रगतीवरून त्या समाजाची प्रगती मोजता येते असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत बाबासाहेबांनी पाहिलेल्या या प्रगत समाजाचे स्वप्न आज साकार होताना दिसत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत. अशाच काही स्त्रियांच्या कर्तुत्वाचा आणि प्रतिनिधित्वाचा सन्मान यंग इन्वायरमेंट ट्रस्ट संस्थेतर्फे जागतिक महिला दिवसाचे […]

Continue Reading 0
disha0

जागतिक महिलादिन विशेष: पवईकर तरुणीची जनजागृतीसाठी इंडिया गेट ते वाघा बॉर्डर सायकलिंग

मानसिक तणाव आणि उदासीनता याच्याशी दोन हात करण्यासाठी ‘खेळाला जवळ करा’ असा संदेश घेऊन पवईकर आणि दोन मुलांची आई असणाऱ्या दिशा श्रीवास्तव (३६), यांनी इंडिया गेट ते वाघा बॉर्डर असा ६०० किलोमीटरचा प्रवास ४ मार्च ते ६ मार्च सायकलवरून करत लोकांच्यात जनजागृती केली. कुरुक्षेत्र, लुधियाना आणि अमृतसर अशा तीन टप्प्यात त्यांचा हा प्रवास झाला. दररोज […]

Continue Reading 0
छायाचित्र: @saurabhistic

पवईकर दांपत्याची बीएमडब्ल्यूने विश्वसफर

@pracha2005 पवईकर जेनेट (५५) आणि लुईस (६१) डिसोझा यांना दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी वेगळे चित्तथरारक करण्याची इच्छा होती. त्यातूनच वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले गेले आणि हे जोडपे २० मे पासून आपल्या बीएमडब्ल्यू गाडीने ४० पेक्षा अधिक देशाच्या विश्वसफरीसाठी निघाले आहे. जवळपास ६ ते ७ महिन्याच्या प्रवासात ५० हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतराची त्यांची ही सफर […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes