Archive | बातमी

container-overturned-at-IIT Main Gate

जेव्हीएलआरवर आयआयटीजवळ कंटेनर पलटला, ३ तास वाहतूक कोंडी

दुभाजक ठरतोय अडथळा, यापूर्वीही या ठिकाणी अपघाताच्या, दुभाजकावर गाड्या चढल्याच्या अनेक घटना. स्थानिकांची दुभाजक हटवण्याची मागणी. पालिका – वाहतूक विभाग यांची टोलवाटोलवी. आज (गुरुवार, १९ सप्टेंबर) पहाटे सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर आयआयटी मेनगेट येथे एक कंटेनर (एमएच ४६ एफ ४९७१) पलटल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत कंटेनर चालकाने बाहेर उडी मारल्यामुळे तो बचावला. मात्र […]

Continue Reading 0
mobile cyber crime

सायबर फसवणुकीत ५२ वर्षीय व्यक्तीने गमावले १.५८ लाख

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २०१७ पासून ते ई-वॉलेट वापरत आहे. सायबर फसवणूकीच्या घटनेत एका ५२ वर्षीय प्रकल्प व्यवस्थापकाला १.५८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पवई येथे रिअल इस्टेट कंपनीत नोकरीस आहेत. फसवणूक करणार्‍याने मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे तक्रारदार यांच्या फोनवर ताबा मिळवत त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. २०१७ पासून तक्रारदार […]

Continue Reading 0
PEHS Hindi Diwas 2019 1

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये साजरा झाला ‘हिंदी भाषा दिवस’

@प्रमोद चव्हाण पवईच्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक पवई इंग्लिश हायस्कूल (पीईएचएस) तर्फे १३ सप्टेंबरला विद्यार्थ्यांना हिंदीचे महत्त्व सांगण्यासाठी “हिंदी भाषा दिवस” साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाट्य अभिनेते नितेश पांडे प्रमुख अतिथी होते. सरस्वती वंदनेने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रभाग स्तरावर प्रथम पारितोषिक मिळवलेल्या या गाण्याला संगीत शिक्षक अमित खोत आणि स्वाती […]

Continue Reading 0
25-years-of-selfless-service-and-devotion-team-hhh

हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटीच्या निःस्वार्थ सेवेची २५ वर्षे

@अनामिका शर्मा अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटी आणि रामबाग पवई वेल्फेअर सोसायटी आयोजित “पवई झील का राजा” गणेशोत्सवानिमित्त एक भव्य भंडारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रिय बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासोबतच हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदाचा भंडारा अधिक खास होता कारण या नि:स्वार्थ सेवेने आणि भक्तीने ह्यावर्षी २५ वर्षे पूर्ण केली आहेत. […]

Continue Reading 0
vruksh tod

वृक्षतोडीच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी – विसंगती, मेट्रो ४ आणि ६ साठी सुधारित प्रस्ताव मागवणार

मेट्रो ४ आणि ६ मार्गिकेसाठी तोडल्या जाणाऱ्या आणि पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या वृक्षांसाठी सुमारे दहा हजार नागरिकांनी इमेलद्वारे एकत्रितपणे आक्षेप नोंदवले. स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (मेट्रो ६) आणि कासारवडवली ते वडाळा (मेट्रो ४) या दोन मेट्रो मार्गिकांमधील १८२१ झाडे हटवण्याकरिता ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये त्रुटी व विसंगती आढळून आल्याने ते प्राधिकरणाला […]

Continue Reading 0
iit powai

आयआयटी बॉम्बेला केंद्र सरकारची सीआयएसएफची सुरक्षेची मागणी, सुरक्षा ऑडिट नियोजित

पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) सुरक्षित केले पाहिजे अशी केंद्र सरकारने मागणी केली आहे. सीआयएसएफ राष्ट्रीय संस्था, विमानतळ, रिफायनरीज आणि शासकीय-संचालित हत्यार कारखाना आणि कंपन्यांना सुरक्षा प्रदान करते. आयआयटी मुंबईकडे सध्या शंभर पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक आहेत. यातील काही माजी सैनिक सुद्धा आहेत. आयआयटी मुंबई हे पवई तलाव […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes